एरंडवणा परिसरात डेंग्यूचा प्रादुर्भाव

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

कोथरुड मधील एरंडवणा परिसरात मोठ्या प्रमाणावर डेंग्यूचा प्रादुर्भाव झाला आहे. येथील प्रतिष्ठित करिष्मा सोसायटीच्या परिसरात २५ पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पालिका प्रशासनाने डासांची उत्पत्ती स्थाने शोधून त्वरीत कारवाई करावी अशी मागणी अॅलर्ट संस्थेच्या वतीने संदीप खर्डेकर यांनी केली आहे.
[amazon_link asins=’B00X3RZTHQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=”]

येथील मोकळ्या जागा, अर्धवट बांधकामांची ठिकाणे, अनेक ठिकाणची डबकी, नाल्याच्या दोन्ही बाजू या ठिकाणी डास प्रतिबंधक औषधांची फवारणी होणे गरजेचे आहे तसेच जनजागृती कार्यक्रम देखील त्वरीत राबवणे अत्यावश्यक आहे. संध्याकाळी धूर फवारणी करण्यास मनाई आहे असे अधिकारी सांगतात. या धूर फवारणीमुळे डास गायब व्हायचे त्यामुळे ती पूर्ववत सुरू करावी. युद्धपातळीवर डेंग्यूला प्रतिबंध करावा असे पालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.