अहमदनगर : डेंग्यूने एकाचा मृत्यू, आठवड्यातील दुसरी घटना

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नगर शहरात सध्या डेंग्यूने अनेक नागरिक त्रस्त आहेत. वैदुवाडी येथील बाबाजी शिंदे यांचा काल मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. शहरात साथ पसरलेली असताना महापालिकेचा आरोग्य विभाग निद्रिस्त झाला आहे.

नगर येथून काही पेशंट अत्यवस्थ झाल्याने पुणे येथे हलविण्यात आले आहे. मागील आठवड्यातच डेंग्यूने एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही महापालिकेच्या आरोग्य विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे परिणामी डेंगू झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

वैदुवाडी येथील बाबाजी शिंदे यांना काही दिवसांपासून डेंगूची लागण झाली होती. उपचार सुरू असताना रविवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शहरात डेंगूची साथ पसरली आहे. तरीही महापालिका आरोग्य विभाग निद्रिस्त आहे. त्यांच्याकडून नागरिकांनी कोणत्या दक्षता घ्यायचा किंवा कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत कुठल्याही प्रकारची हालचाल झाल्याचे दिसत नाही.

डेंग्यूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने दक्षता घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –