कोल्हापूरात घरांमध्ये आढळल्या डेंग्यूच्या आळ्या

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन

शिल्पा माजगावकर
कोल्हापूर शहरात सध्या डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असताना, महापालिकेने शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम राबवली, या वेळी घरोघरी असलेल्या फ्रीजच्या मागील बाजूस असणाऱ्या ट्रेमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. या मुळे नागरीकही चक्रावून गेले आहेत.

डेंग्यूच्या डास घाण पाण्यामुळे होतो, असा अनेकांचा गैरसमज आहे. मात्र साठलेले पाणी आणि फ्रीजच्या कंडेन्सरमध्ये अळ्यांचे साम्राज्य आढळून आल्याने कोल्हापुरातील नागरिकही चक्रावून गेले आहेत. कोल्हापूरच्या काही भागात दरवर्षी पावसाळ्यात डेंगीची साथ येते. महापालिका प्रशासन गटारी, पिण्याचे पाणी याबरोबरच औषध फवारणीवर लक्ष देते. यावर्षीही डेंगीची साथ आलीय. या मध्ये एक जणाचा बळीही गेलाय.

जनजागृती साठी महापालिका आरोग्य विभागानं धडक मोहिम सुरु केली आहे. महापालिका कर्मचाऱ्यांनी शहरातील उपनगरांमधिल घरांमध्ये काल पासून फ्रीजची तपासणी करण्यास सुरवात केली आहे. या वेळी घरात साटलेल्या पाण्या बरोबरच फ्रीज च्या मागील बाजूस असणाऱ्या ट्रे मध्ये अळ्या आढळून येत आहेत.शहरातील शंभरावर घरामध्ये आरोग्य विभागाला अळ्या सापडल्या आहेत. बाहेरील वातावरण स्वच्छ ठेवताना आता आपल्या घरातील फ्रीज आणि पाणी साठवण्याची ठिकाणही स्वच्छ ठेवली पाहिजेत असे आवाहन महापालिकेने केले आहे. काल दिवसभर ८३० कुटुंबांचा सर्व्हे झाला. पैकी ७७ घरांतडेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या.

डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत चालल्याने महापालिकेने आरोग्य विभागाची विविध पथकं तयार करून संपुर्ण शहर आणि उपनगरात जनजागृती मोहिम सुरु केली आहे.