शिरूर : डेंगूने त्रस्त असलेल्या मुस्लीम युवकाने ईद साजरी न करता केली पुरग्रस्तांना मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शिरूर येथील डेंगू ने त्रस्त दवाखान्यात उपचार घेत असणाऱ्या मुस्लीम तरूणाने ईद साजरी न करता सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी दहा हजार रुपयांचा निधी दिला आहे.

याबाबतची माहिती अशी की, शिरूर शहरातील समीर नसिमखान हा सर्वसामान्य कुटुंबातील मुस्लिम तरुण डेंगूच्या रोगावर शिरूर येथील संदीप परदेशी हॉस्पिटल येथे उपचार घेत आहे. उपचार घेत असताना आज असणारी बकरी ईदचा सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी त्याने निधी देण्याचा निर्णय घेतला. हा निधी देण्यासाठी त्याने शिरूर-हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांना कॉल केला. त्या नुसार माजी आमदार अशोक पवार, यांनी हाॅस्पिटल मध्ये येऊन डाॅ. संदिप परदेशी, वकील सेलचे अ‍ॅड. रवींद्र खांडरे, अ‍ॅड. शिरीष लोळगे, बिजवंत शिंदे, अजित डोेंगरे, शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी व नातेवाईक यांच्या उपस्थितीत निधी स्विकारला.

बकरी ईदचा सण साजरा न करता सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी निधी देऊन समीर नसिमखान या तरुणाने पूरग्रस्त बांधवांच्या प्रति दाखवलेली आपुलकी, प्रेम काैतुकास्पद असुन उपस्थित मान्यवरांसह सर्वांनी त्याचे अभिनंदन केले.

आरोग्यविषयक वृत्त