Dengue Patients-Pune Corona | शहरात कोरोनासोबतच डेंग्युच्या रुग्णांच्या संख्येत वाढ ! डेंग्यु रोखण्यसाठी नागरिकांनी स्वत:च्या घरापासून काळजी घ्यावी; महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Dengue Patients-Pune Corona | शहरात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असताना सततच्या पावसामुळे डेंग्युचे रुग्णही वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांचे प्रमाण कमी आहे. मात्र, डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पावसाळ्यात नागरिकांनी घरात, घरावर आणि परिसरात खोलगट वस्तूंमध्ये पाणी साठून डासांचे ब्रिडींग होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे असे आवाहन महापालिकेचे (PMC Health Department) सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे (Dr. Sanjiv Wavare) यांनी केले आहे. (Dengue Patients-Pune Corona)

 

मागील काही दिवसांपासून शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मागील आठवड्याभरापासून दररोज नवीन ५०० हून अधिक कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळून येत आहेत. आजमितीला शहरात साडेतीन हजार ऍक्टीव्ह रुग्ण आहेत. यापैकी जेमतेम तीन टक्के रुग्ण उचारासाठी रुग्णालयात दाखल असून ऑक्सीजनवरील रुग्णांची संख्या नगण्य आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा तसेच आवश्यक ती काळजी घ्यावी. (Dengue Patients-Pune Corona)

 

सध्या सततच्या पावसामुळे थंडी, ताप, सर्दीचे रुग्ण वाढत आहेत. तसेच डेंग्युचे रुग्णही वाढत आहेत.
जुलैच्या पहिल्या आठ दिवसांत डेंग्यूचे १६४ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी २४ रुग्ण डेंग्यू पॉझीटीव्ह आढळले आहेत.
या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाने प्रत्येक क्षेत्रिय कार्यालय पातळीवर स्वतंत्र पथक तयार केले आहे.
डेंग्यूचा रुग्ण आढळलेल्या परिसरातील शंभरहून अधिक घरांची तपासणी करण्यात येत आहे.
प्रामुख्याने फ्रिजच्या ट्रेमध्ये साठलेले पाणी, फ्लॉवरपॉट तसेच घराच्या छतावर व आजूबाजूला पडलेल्या खोलगट वस्तू,
उदा. रिकामे डबे, टायर, नारळाच्या करवंट्या, प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये साठलेले पाणी याचीही तपासणी करण्यात येत आहे.
प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीमध्ये १५ ते २० ब्रिडींग स्पॉट सापडत आहेत.
त्याठिकाणी हे ब्रिडींग स्पॉट नष्ट करून औषध फवारणी करण्यात येत आहे.
आतापर्यंत २०० नागरिकांना हलगर्जीपणा केल्याबद्दल नोटीस पाठविण्यात आली असून २८ हजार दंडही वसुल करण्यात आले आहेत.
नागरिकांनी स्वच्छ पाणी साठणार नाही व त्यामध्ये डासांचे ब्रिडींग होणार नाही याची स्वत:चे घर आणि परिसरापासून काळजी घ्यावी,
असे आवाहन डॉ. संजीव वावरे यांनी केले आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी गंभीर रुग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे.
यासोबतच डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत.
महापालिकेने क्षेत्रिय कार्यालय स्तरावर पथकं स्थापन करून डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत असलेल्या ठिकाणचे सर्वेक्षण सुरू केले आहे.
आतापर्यंत २०० नागरिकांना नोटीसेस दिल्या असून २८ हजार रुपये दंड वसुल केला आहे.

डॉ. संजीव वावरे
(सहाय्यक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका)

 

Web Title :- Dengue Patients-Pune Corona | Increase in the number of dengue patients in the city along with corona Citizens should take care of their own homes to prevent dengue Appeal of Municipal Health Department

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा