धक्कादायक ! डेंग्यूच्या प्रादुर्भावाला नागरिकांकडूनच ‘खतपाणी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – एकीकडे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असताना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांना शहरातील सोसायट्या आणि नागरिक आडकाठी करत असल्याची वस्तुस्थिती सर्वेक्षणात उघडकीस आली आहे. डासांची उत्पत्ती स्थाने शोधून तिथे धूरफवारणी करण्यालाच शहरातील ९ हजार ५१३ कुटुंबीय व सोसायट्यानी हरकत घेतल्याची बाब आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात उघड झाली आहे.

सद्यस्थितीत शहर आणि परिसरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत अनेक भागात सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. १ हजार ३०७ सार्वजनिक ठिकाणी तर २ हजार १०७ खासगी ठिकाणी डासांची उत्पत्ती स्थाने आढळली आहेत. सरकारी कार्यालये, निम सरकारी कार्यालये, खासगी बंगले, सोसायट्या , झोपडपट्ट्या , सर्व जलतरण तलाव, बांधकाम साईट आदींसह सर्वच ठिकाणी हे सर्वेक्षण सुरु आहे. ज्या ठिकाणी डासांची उत्पत्ती स्थानावर डासांच्या अळ्या सापडल्या आहेत, त्या अळ्या कोणत्या डासांच्या प्रकारच्या आहेत, याची तपासणी केली जात असून त्या- त्या ठिकाणी धूरफवारणी- औषध फवारणी करून उत्पत्तीस्थाने नष्ट केली जात आहेत.

सध्या शहरात ३ हजार ४१४ ठिकाणी एकूण डासांची उत्पत्तीस्थाने सापडल्याने सर्वेक्षणाची मोहीम व्यापक करण्यात आली आहे या वर्षी १ ते १४ जूनपर्यंत शहराच्या विविध भागांतील ७ लाख ४६ हजार ९४२ खासगी ठिकाणी सर्वेक्षणांतर्गत धूर फवारणी करण्यात आली आहे. ४८ हजार ७९१ सार्वजनिक ठिकाणी धूर फवारणी करण्यात आली. मात्र या सर्वेक्षण अंतर्गत धूरफवारणी करण्यास खासगी बंगले, आणि सोसायट्यामधील नागरिकच विरोध करत असल्याची बाब उघडकीस आली आहे. एकूण ९ हजार ५१३ कुटुंबीय व सोसायट्यांनी धुरफवारणीस हरकत घेतल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अशा नागरिकांवर नोटिसा देऊन दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचेही समजते.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

..म्हणून ‘बिग बॉस’ बॅन करण्यासाठी वकिलाची तक्रार दाखल

अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिराने ‘तेथे’ फोटो काढला, त्यानंतर मात्र,.