पोलीसनामा ऑनलाइन टीम – Dental Health | मंद स्मित हास्य चेहर्याच्या सौंदर्यात भर घालतं. हास्याच्या सौंदर्यासाठी चकचकीत दात असणं आवश्यक असतं. पिवळे आणि मळकट दात चेहर्याचे सौंदर्य घालवतात. जर पिवळे आणि घाणेरडे दात आपल्या सौंदर्यातील डागासारखे असतील तर (Dental Health). त्यामुळे यासाठी काही घरगुती उपाय (Home Remedies For Healthy Gums And Teeth) केले जाऊ शकतात. घरात ठेवलेल्या वस्तूंनी पिवळे दात स्वच्छ करून पॉलिशही करता येतात. चला तर मग जाणून घेऊयात त्या सोप्या गोष्टी कोणत्या आहेत.
दात पिवळे होण्याची अनेक कारणे असू शकतात. तंबाखू आणि दारूच्या सेवनाबरोबरच जास्त कॉफी आणि चहा प्यायल्याने दातही पिवळे होतात. पण काही घरगुती उपायांमुळे या पिवळेपणापासून सुटका होऊ शकते (Dental Health).
कडुलिंबाचे फायदे (Benefits Of Neem) :
कडुलिंबाचे झाड हे औषधी गुणधर्मांचे भांडार मानले जाते. त्वचा आणि इतर आजारांप्रमाणेच पिवळ्या दातांसाठीही कडुलिंब गुणकारी आहे. अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म (Anti-Bacterial Properties) असलेल्या कडुलिंबाच्या देठाने ब्रश केल्याने दातांच्या बर्याच समस्यांपासून मुक्तता मिळते. त्याचबरोबर पिवळे दातही पांढरे होतात. दातून व्यतिरिक्त कडुलिंबाच्या सालीची पावडर दातांवर जावूनही घासता येते.
फ्लॉसिंग (Flossing) :
दिवसातून दोन वेळा ब्रशने दात स्वच्छ करण्याबरोबरच फ्लॉसिंगही करायलाच हवं. फ्लॉसिंगद्वारे दातांच्या मधोमध अडकलेले अन्नाचे सूक्ष्म कण काढून टाकले जातात. त्यामुळे दातांमध्ये जीवाणूंची वाढ होणार नाही. त्याचबरोबर दातांमध्ये दिसणारी घाणही साफ होते.
मीठ गुणकारी (Salt Is Curative) :
मीठानेही दात स्वच्छ करता येतात. मिठाच्या साहाय्याने दातांमध्ये साचलेली घाण व जीवाणू साफ होतात.
मोहरीच्या तेलात मीठ टाकून दात स्वच्छ केल्याने पिवळसरपणा दूर होतो आणि पांढरेपणा वाढतो.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Dental Health | how to get rid of yellow teeth at home
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update