..म्हणून जन्मापासूनच घ्यावी बाळाच्या ‘मौखिक’ आरोग्याची काळजी

पोलीसनामा ऑलाइन टीम – मुलांच्या मौखिक आरोग्याची काळजी त्यांच्या जन्मापासून घेतली पाहिजे. आईच्या उदरातच त्यांच्या मौखिक आरोग्यास सुरूवात होते, असे तज्ज्ञ सांगतात. यासाठी मुलांचे मौखिक आरोग्य महत्वाचे आहे.

लहानपणापासून मौखिक स्वच्छता राखल्यास प्रौढ वयातही मौखिक आरोग्य चांगले राहते. दुधाच्या दातांचे खूप महत्व असते. वर्षातून किमान एकदा लहान मुलांच्या दातांच्या डॉक्टरांकडून दात तपासून घेतले पाहिजेत. यामुळे काही त्रास असेल तर वेळीच उपचार सुरू करता येतात. मुलांना दातांच्या डॉक्टरांची भीती दाखवू नये. योग्य मौखिक काळजी न घेणे, खाण्याच्या अयोग्य सवयी, पालकांमध्ये जगजागृतीचा अभाव आणि दातांच्या डॉक्टरांकडे न जाणे यामुळे ५ वर्षांखालील वयाच्या मुलांना दातांच्या समस्या निर्माण होतात. योग्य मौखिक स्वच्छता न राखल्यास बाळाच्या आरोग्यावर परिणाम होतो.

यामुळे मुलांच्या खाण्यावरही परिणाम होतो आणि मुलांचे वजन कमी होते. मौखिक आरोग्यासाठी काही मार्गदर्शक तत्व असून त्यांचे पालन करावे. आई आणि बाळाच्या मौखिक आरोग्याचा एकमेकांशी संबंध आहे. गरोदर महिलेनं तिची मौखिक स्वच्छता ठेवली पाहिजे. फ्लुओरिडेट टूथपेस्टने दिवसातून दोनदा दात घासावेत. मॉर्निंग सिकनेस आणि उलटी होत असेल तर पाणी आणि बेकिंग सोडा याच्या मिश्रणाने चूळ भरावी. दात किडू नयेत यासाठी गोड खाणे टाळावे. हिरड्या सूजण्याची किंवा हिरड्यांमधून रक्तस्राव होत असल्यास दातांच्या डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत.

मुलांच्या दातांची रचना तपासावी. ती योग्य नसल्यास ऑर्थोडोनटिस्टला भेटावे. कमी साखर असलेला योग्य असा आहार मुलांना द्यावा. मुलांना मौखिक स्वच्छता राखण्याची सवय लावावी.