‘चारा’ घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादवांना जामीन !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना रांची उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. देवघर कोषागार प्रकरणात अर्धी शिक्षा भोगल्यानंतर लालू यांच्याकडून जामीन मिळावा यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सुनावणी करताना रांची उच्च न्यायालयाने लालू यादव यांना जामीन केला आहे. याशिवाय न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
|

चारा घोटाळ्या प्रकरणी ५ जुलैला न्यायालयात सुनावणी झाली होती, परंतू त्यात लालू यांनी दिलासा मिळाला नव्हता. त्यानंतर लालू यादव यांनी जामीन मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणी सुनावणीसाठी १२ जुलै तारीख सांगितली होती. लालू यादव चारा घोटाळ्या प्रकरणी रांचीच्या तुरुंगात बंद होते.

काय आहे प्रकरण 
या वर्षी २९ मे ला रांचीच्या विशेष न्यायालयात कोट्यावधी रुपयांच्या चारा घोटाळ्या प्रकरणी १६ आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते आणि त्यांना ३ ते ६ वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावण्यात आली होती. एस, एन, मिश्राच्या विशेष सीबीआय न्यायालयाने चाईबासा ट्रेजरीतून घोटाळा करुन ३७ कोटी रुपये काढल्या प्रकरणी १६ लोकांना दोषी ठरवण्यात आले होते. न्यायालयाने यातील ११ लोकांना ३ वर्ष आणि ५ जणांना ४ वर्षांपर्यंत शिक्षा सुनावली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा