Department of Agriculture Raid | बोगस बियाण्यांच्या गोदामावर कृषी विभागाची छापेमारी; 2 कोंटीचा मुद्देमाल जप्त, दोघांवर FIR

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Department of Agriculture Raid | सातारा येथील औद्योगिक वसाहतीतील (Satara Industrial Estate) एका गोदामामध्ये कृषी विभागाकडून छापेमारी (Department of Agriculture Raid) करण्यात आली आहे. त्यावेळी सोयाबीनचे बोगस बियाणे तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये 1 हजार 22 क्विंटल बियाणे आणि एकूण दोन कोटींहून जादा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात (Satara City Police Station) दोघांविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, कृषी विभागाच्या पथकाने 5 मे रोजी औद्योगिक वसाहतीतील अनुप ओमप्रकाश डाळ्या (Anup Omprakash Dalya) (रा. उत्तेकर नगर, सातारा) यांच्या खासगी गोदामाची तपासणी केली.
त्यावेळी त्यांना सोयाबीन बियाणे चाळणी लावून 25 किलोंच्या पिशव्यांचे बॅगिंग आणि टॅगिंग करताना आढळले.
तसेच तेथे 25 किलोच्या 1916 बॅगांत 479 क्विंटल बियाणे आणि गोणपटाच्या 50 किलोच्या वजनाच्या 1086 बॅगा आढळल्या. (Department of Agriculture Raid)

यामध्ये 543 क्विंटल सोयाबीन होते. असे एकूण एक हजार 22 क्विंटल सोयाबीनचे बोगस बियाणे आढळले.
या सोयाबीनचा दर अंदाजे दोन कोटी 4 लाख 40 हजार रुपये आहे.
तसेच, मजकूर छापलेल्या 520 रिकाम्या बॅगा, 470 लेबल्स, बॅगच्या 2 शिलाई मशिन, 1 वजन काटा आणि बियाणे प्रोसेसिंग मशिनही दिसून आले आहे.

 

दरम्यान, याप्रकरणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील (District Superintendent of Agriculture Office)
गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक रविराज कदम (Raviraj Kadam) यांनी तक्रार दिली आहे.
त्यानंतर बुधराव राकेश दवंडे (Budhrao Rakesh Davande) (रा. गंज बेतुल, मध्यप्रदेश) आणि कंपनी प्रतिनिधी अमित दिवाण (Amit Diwan) यांच्या विरोधात शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा (FIR) दाखल झाला आहे.
याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर (Senior PI Bhagwan Nimbalkar) तपास करत आहेत.

 

Web Title :- Department of Agriculture Raid | raid on bogus seed godown in satara seizure of property worth rs 2 crore both were charged in satara

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा