फ्रिज, AC-TV सह 54 आयटम्स विकतेय सरकार, 31 ऑगस्टपर्यंत खरेदी करण्याची संधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्हाला घरातील वस्तू स्वस्त खर्चात खरेदी करायची असल्यास तुमच्यासाठी एक विशेष संधी आहे. ही संधी सरकारकडून दिली जात आहे. त्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया…

वास्तविक, अर्थ मंत्रालयांतर्गत येणारा गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग (दीपम) आपल्या काही जुन्या वस्तू विकत आहे. यात फर्निचर, एअर कंडिशनर, टीव्ही, की-बोर्ड, पॉवर प्लग आणि फ्रीजसह एकूण ५४ वस्तूंचा समावेश आहे.

या त्या वस्तू आहेत, ज्यांची गरज बहुतेक घरांना आहे. यासाठी दीपमकडून निविदा काढली जात आहे. ही निविदा १४ ऑगस्ट रोजी सादर केली जाईल.

तर त्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे. याचा अर्थ असा की, जर तुम्हाला हे सामान खरेदी करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला निविदासाठी अर्ज करावा लागेल.

दीपमकडून जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, निविदा कागदपत्रे http://eprocure.gov.in/eprocure/app आणि विभाग संकेतस्थळ dipam.gov.in वरून डाउनलोड करता येतील. ही निविदा ३१ ऑगस्ट रोजीच उघडण्यात येणार आहे.

निविदेत ही वस्तू त्यालाच दिली जाईल, ज्याने सर्वाधिक बोली लावली असेल. बोली लावणारे निविदाकार वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्यांची तपासणी करू शकतात.

यात वस्तू परत करण्यासारखी सवलत नाही. यशस्वी निविदाकार उर्वरित रक्कम डिमांड ड्राफ्ट/ पे ऑर्डर किंवा बँक चेकद्वारे जमा करू शकतात.

तसेच ज्या व्यक्तीला हे सामान दिले जाईल, त्याला देय दिल्यानंतर ५ दिवसांच्या आत सर्व वस्तू काढणे आवश्यक आहे.