आता घरबसल्या पोस्ट ऑफिसमधील अकाऊंटमध्ये करा मोठी बचत, सुरू झालीय ‘ही’ खास सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोस्ट ऑफिसमधील बचत योजनेचा वापर करणे आता खूप सोपे झाले आहे. मात्र आता सरकारने पोस्ट ऑफिसमध्ये नवीन सेवा सुरू केली असून यामुळे तुम्ही घरी बसल्या पोस्टातील कामे करू शकता. डिपार्टमेंट ऑफ पोस्टाने बचत खातेधारकांसाठी मोबाईल बँकिंग सुविधा सुरु केली असून तुम्ही या माध्यमातून तुमची सर्व कामे करू शकणार आहात.

या नवीन सुविधेमुळे शेतकरी विकास पत्र, नॅशनल सेविंग्स सर्टिफिकेट या सर्व सेवांचा लाभ तुम्ही घरी बसल्या घेऊ शकता. त्याचबरोबर खात्यातील शिल्लक आणि विविध सेवांची माहिती तुम्ही घरबसल्या घेऊ शकता. तसेच ट्रांजेक्‍शन हिस्‍ट्री आणि इतर प्रकारची माहिती तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करू शकता. याआधी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेसाठी मोबाईल बँकिंग सुविधा उपलब्ध आहे. यासाठी बँकेने 15 ऑक्टोबर रोजी हे ऍप लाँच केले आहे.

कोण घेऊ शकतं लाभ
डिपार्टमेंट ऑफ पोस्टाने दिलेल्या माहितीनुसार, पोस्टामध्ये बचत खाते असलेला कोणताही व्यक्ती याचा लाभ घेऊ शकतो. यासाठी तुम्हाला तुमच्या ऍपवरून लॉगइन करावे लागणार आहे. एकल खाते आणि जॉईंट खाते असलेल्या व्यक्ती देखील या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

हि कागदपत्रे लागणार
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांकडे त्यांचा E-mail ID असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पॅनकार्ड क्रमांक आणि मोबाईल क्रमांक असणे गरजेचे आहे. तसेच तुमची सर्व योग्य माहिती देणे बंधनकारक आहे.

या पद्धतीने करा अर्ज
या सुविधेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असल्यास तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये यासाठी अर्ज करू शकता. यामध्ये तुम्हाला एक अर्जाचा फॉर्म भरून द्यावा लागणार असून यामध्ये तुमची सर्व योग्य माहिती भरून जमा करायची आहे. तसेच एकापेक्षा जास्त खाती असतील तर प्रत्येक खात्यासाठी वेगळा मोबाईल क्रमांक हवा. अर्ज केल्यानंतर तुम्हाला 24 तासाच्या आत हि सेवा मिळेल. यासाठी “India Post Mobile Banking” ऍप तुम्हाला मोबाईलमध्ये डाउनलोड करावे लागणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like