सांगलीत हद्दपार गुन्हेगारास अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – सांगलीसह 4 जिल्ह्यांतून हद्दपार केलेल्या गुन्हेगारास आदेशाचा भंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. जावेद अब्दूल वाहिद नदाफ असे अटक केलेल्याचे नाव आहे. विश्रामबाग पोलिसांनी गुरुवारी ही कारवाई केली.

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. विश्रामबाग पोलिसांचे एक पथक किसान चौक परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी जावेद संशयास्पदरित्या फिरताना दिसून आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर हद्दपार आदेशाचा भंग करून तो शहरात आल्याचे स्पष्ट झाले.

त्याला सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. आदेशाचा भंग केल्याने त्याला अटक करण्यात आली. विश्रामबागचे सहाय्यक निरीक्षक डी. बी. पिसाळ, दीपक परीट यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आरोग्यविषयक वृत्त –