बँक दिवाळखोरीत निघाल्यास तुमच्या अकाऊंटमधील ‘एवढे’च पैसे सुरक्षित, RTI च्या उत्तरात RBI नं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर एखादी बँक बुडाली तर त्या बँकेत खाते असणाऱ्यांना जास्तीत जास्त एक लाख रुपयेचं मिळतात. मग त्यांच्या खात्यातील रक्कम कितीही जास्त असो. भारतीय रिझर्व बँकेचे (RBI) सब्सिडिअरी डिपॉजिट इंश्युरंस आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) नुसार विम्याचा अर्थ हाच आहे की जमा रक्कम कितीही असो ग्राहकाला 1 लाख रुपयेच परत मिळणार.

सर्व बॅंकधारकांचा विमा करणाऱ्या DICGC ने दिलेल्या माहितीनुसार आरटीआयला उत्तर देताना ही माहिती समोर आली आहे की, फिक्स्ड डिपॉझिट, करंट डिपॉजिट आणि रिकरिंग डिपॉजिट खात्यांना कव्हर करते.

1 लाख रुपये सुरक्षित
DICGC Act, 1961 च्या कलम 16 (1) नुसार एखादी बँक बुडते किंवा दिवाळखोरीत निघते तेव्हा DICGC प्रत्येक खातेधारकाला देय देण्यासाठी जबाबदार असते. त्यांच्या जमा रकमेवर एक लाखांचा विमा असतो. जर तुमचे एका बँकेचे एकच खाते आहे तर खात्यातील जमा पैशांवर व्याज पकडून एक लाखांपर्यंतची रक्कमच सुरक्षित मानली जाणार आहे.

एवढेच नाही तर जर तुमचे एकाच बँकेत एकापेक्षा अधिक खाते आहे आणि FD आहे तर बँक जर बुडाली किंवा डिफॉल्टमध्ये गेली तर तुम्हाला एक लाख रुपयेच भेटू शकतात. शिवाय ही रक्कम कशा प्रकारे मिळणार हे सुद्धा DICGC ठरवणार आहे.

विमा रक्कम वाढवण्याबाबत माहिती नाही
नुकत्याच झालेल्या पीएमसी घोटाळ्यानंतर भारतीय रिझर्व बँक या एक लाखाच्या रकमेत वाढ करण्याबाबत काही विचार करत आहे का असे देखील विचारण्यात आले होते. त्यावर DICGC ने सांगितले की याबाबतची कोणतीही माहिती सध्या उपलब्ध नाही. DICGC ने स्पष्ट सांगितले की बँक बुडाली किंवा दिवाळखोरीत निघाली तर ग्राहकाचे जास्तीत जास्त एक लाख रुपये सुरक्षित आहेत.

24 सप्टेंबर नंतर आरबीआयने पीएमसी बँकेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी बँकेवर काही निर्बंध लादले होते आणि याबाबतची माहिती मिळवण्यासाठी एक समिती नियुक्त केली आहे. सुरुवातीला आरबीआयने पीएमसी बँकेतील ग्राहकांना सहा महिन्याला दहा हजार रुपये काढण्याची परवानगी दिली होती. नंतर आरबीआयने याची मर्यादा वाढवत ५० हजार रुपये इतकी केली होती. त्यानंतरच बँकेतील खातेधारकांचे केवळ एक लाख रुपये सुरक्षित आहेत अशी चर्चा सुरु झाली होती.

Visit : policenama.com