डिप्रेशनमुळे होतो स्मृतीवर परिणाम

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – तरुण वयात डिप्रेशन आल्यास वयाच्या पन्नाशीपर्यंत स्मृतीवर परिणाम होतो. एका संशोधनातून हे वास्तव समोर आलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्सच्या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या यासंदर्भातील अभ्यासात हे उघड झाले असून ब्रिटिश जर्नल ऑफ सायकॅट्रीमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे. या मानसशास्त्रज्ञांनी १९५८ साली स्थापन झालेल्या नॅशनल चाईल्ड डेव्हलपमेंट स्टडीच्या अहवालाचा अभ्यास केला. १८,००० बाळांचा जन्मापासून त्यांच्या प्रौढावस्थेपर्यंत सर्वेक्षण केलं आणि यातून हे निष्कर्ष मांडले आहेत.

२०, ३० आणि ४० व्या वयात डिप्रेशन आणि चिडचिडेपणामुळे वयाच्या पन्नाशीत स्मृतीवर परिणाम होतो. अगदी कमी डिप्रेशन आणि चिडचिडपेणामुळे आयुष्याच्या मध्यात स्मृतीवर परिणाम होतो. जसजसं डिप्रेशन आणि चिडचिडेपणा वाढतो, तसतसं त्याचा स्मृतीवर अधिकच परिणाम होतो. प्रौढावस्थेत डिप्रेशन जास्त असल्यास भविष्यात स्मृतीवर परिणाम होण्याचा धोका जास्त बळावतो. त्यामुळे भविष्यात मानसिक आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी प्रौढावस्थतेतील डिप्रेशनबाबत योग्य व्यवस्थापन होणं गरजेचं असल्याचं या अभ्यासातून स्पष्ट होतं आहे.