‘वंचित’ आघाडीमुळेच दलित सत्तेपासून ‘वंचित’ : रामदास आठवले

कोल्हापूर : पोलिसनामा ऑनलाईन – आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते एकमेकांवर टोकाचे आरोप -प्रत्यारोप करतात. त्यातच रिपाइं नेते सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वंचित आघाडीवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले कि, वंचित बहुजन आघाडीमुळे दलित वर्ग सत्तेपासून वंचित राहत आहे. त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना आठवले म्हणाले कि, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी स्थापन केलेली वंचित आघाडी ही दलितांना सत्तेपासून वंचित ठेवणारी आघाडी आहे. आगमी काळात सत्तेत यायचे असेल तर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आता ‘एनडीए’सोबत यावे. मात्र आम्हांला ओवेसी चालणार नाही. आगामी विधानसभेला १८ पैकी १० जागा रिपाइं (A) गटाला मिळाव्यात. आगामी काळात होणाऱ्या विस्तारावेळी मंत्रिपद मिळावे. ५० कार्यकर्त्यांना महामंडळामध्ये स्थान मिळावे, या आपल्या मागण्या आहेत. असेही आठवले यांनी या वेळी बोलताना सांगितले. गेल्या वेळी आम्ही आमच्या चिन्हावर लढलो होतो त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत आम्ही कमळ चिन्हावर लढणार नसल्याचेही ते बोलले.

शरद पवार यांनी NDA येण्याचा विचार करावा

काँग्रेसची दोन्ही निवडणुकीतील अवस्था पाहता देशात काँग्रेस लवकर सत्तेत येईल असे वाटत नाही यापुढच्या काळात दोन्ही कॉँग्रेसना भवितव्य नसल्याने शरद पवार यांनी ‘एनडीए’मध्ये येण्याचा विचार करावा असे आवाहन आठवलेंनी केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

डिप्रेशनवर उपचार करा घरच्या घरी ; ‘ह्या’ सात सोप्या पद्धती

‘बल्जिंग डिस्क’ आजार माहीत आहे? जाणून घ्या कारणे

गरोदरपणा नंतरचा लठ्ठपणा नको ? मग ‘हे’ पाणी प्या

‘Sexsomnia’ने ग्रासित लोक झोपेमध्येही ‘हे’ करतात