झोपडपट्टीतील वंचितांसाठी मिळाला हक्काचा निवारा – सिंधुताई सकपाळ

सिंधुताई सकपाळ यांच्या हस्ते 'घर पाहणी व दस्तावेज वाटप'

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील मंगळवार पेठ येथील सदानंद नगर येथे झोपडपट्टीतील वंचितांसाठी बांधल्या गेलेल्या घरांची पाहणी व घरांचे दस्तावेज अनाथांची माय सिंधुताई सकपाळ यांचे हस्ते नागरिकांना हस्तांरित करण्यात आले. यावेळी नवीन सदनिकांचे उदघाटन व सदनिकांची पाहणी सिंधुताई सकपाळ यांनी केली. याप्रसंगी मा. नगरसेवक सदानंद शेट्टी, नगरसेवक सुजाता शेट्टी, मा. आमदार मोहन जोशी, पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, अभय छाचेड, बाळसाहेब शिवरकर, मुक्तार शेख, संजय बालगुडे असे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Sindhutai-Sakpal
यावेळी बोलताना सिंधुताई सकपाळ म्हणाल्या कि सदानंद शेट्टी यांनी अथक प्रयत्न करून २९ वर्ष झोपडपट्टीत वास्तव करणाऱ्या नागरिकांना त्यांच्या हक्काचं घर देण्याचं स्वप्न पाहिलं होत ते स्वप्न आज पूर्ण झाले आहे. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या वंचितांसाठी हक्काचा निवारा मिळवून देणारे सदानंद शेट्टी हे झोपडपट्टी वासियांचे मसीहा आहेत. पुढे भावूक होताना त्या म्हणाल्या कि मी २० वर्षाची असताना स्मशानात राहायची त्यावेळी राहायला मला घर नव्हतं स्मशानच माझं घर झालं होत. माणसाने जिद्दीने संकटाना सामोरे गेले गेले पाहिजे. काहीही झाले तरी हार नाही मानली पाहिजे.

महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे प्रतिनिधी व मा.नगरसेवक सदानंद शेट्टी म्हणाले कि मंगळवार पेठ या ठिकाणी सदानंद नगरचा ११ नोव्हेबर २०११ रोजी आम्ही पाया रोवला. तब्बल दोन एकरावर विस्तारलेल्या ११ मजली इमारतीमध्ये ६२१ पैकी दिनांक ११ ऑगस्ट रोजी ४४२ कुटुंब राहण्यासाठी आली. त्यानंतर आज दुसऱ्या टप्प्यात १७९ सदनिका आणि व्यापारी गाळे काही घरांचे दस्तावेज आम्ही नागरिकांना हस्तांतरित आज करताना आम्हाला वेगळेच समाधान होत आहे. झोपडपट्टीतील जनतेच्या मी सदैव पाठीशी उभा होताे आणि येथून पुढे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. शेट्टी यांनी ‘झोपडपट्टी पुनर्वसन कृती समिती’ची स्थापना केली व या नामफलकाचे उदघाटन सिंधुताई सकपाळ यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मेंद्र खेत्रे यांनी केले.

आरोग्यविषयक वृत्त –