मनपा युनियन सर्वसाधारण सभेपूर्वीच उपाध्यक्षांचा राजीनामा

युनियनमधील वाद चिघळला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – महानगरपालिका कर्मचारी युनियनची आजची सर्वसाधारण सभा होण्यापूर्वीच विद्यमान उपाध्यक्ष विजय बोधे यांनी राजीनामा दिला आहे. अगोदरच कार्याध्यक्षांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेला काही अर्थच उरला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे

युनियनची आज सर्वसाधारण सभा होत आहे. यात नवीन पदाधिकार्‍यांची निवड करण्याचा विषय अजेंड्यावर घेण्यात आला आहे. विद्यमान अध्यक्ष अनंत लोखंडे, सचिव आनंदराव वायकर यांची फेरनिवड होऊन दोन जणांना कार्याध्यक्ष म्हणून संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी पाशा शेख व गुलाब गाडे यांची नावे निश्‍चित झाल्याची चर्चा आहे. मात्र, युनियनचे अध्यक्ष दबावाखाली काम करत आहेत. आज सभा असली तरी बुधवारीच पदाधिकारी निवडले गेले आहेत. त्यामुळे आजच्या सभेला अर्थ नसून, हा निर्णय मान्य नसल्याने मी युनियनमधून बाहेर पडणार असल्याचा इशारा विद्यमान उपाध्यक्ष बोधे यांनी दिला आहे.

युनियनचे अध्यक्ष दबावाखाली काम करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. बोधे यांनी राजीनामा दिल्याने सर्वसाधारण सभेत नेमका काय होते, याकडे आता महापालिका कर्मचारी वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अनेक वर्षांपासून लोखंडे हे अध्यक्षपदाला चिकटून बसले आहेत, असा आरोपही होऊ लागला आहे.

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी