अजित पवार ‘अर्थमंत्री’ तर आदित्य ठाकरेंना ‘पर्यावरण’ खातं, असं आहे ‘संभाव्य’ खातेवाटप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार अखेर सोमवारी पार पडला या वेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा तीनही पक्षातील नेत्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर कोणाला कोणते मंत्री पद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. एका मराठी वृत्तवाहिनेने खाते वाटपा संदर्भातील संभाव्य यादी जाहीर केली आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन खाते दिले जाऊ शकते. तर आदित्य ठाकरेंकडे पर्यावरण व तंत्रशिक्षण खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते. शपथविधी सोहळ्यानंतर उद्धव ठाकरे यांची पूर्ण मंत्रिमंडळासोबत बैठक पार पडली होती या वेळी खातेवाटप निश्चित झाले असून आज संध्याकाळपर्यंत ते जाहीर केले जाऊ शकते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचे संभाव्य खातेवाटप
अजित पवार- अर्थ आणि नियोजन
जयंत पाटील- जलसंपदा
अनिल देशमुख- गृह खातं
धनंजय मुंडे- सामाजिक न्याय
दिलीप वळसे पाटील- कौशल्य विकास आणि कामगार
जितेंद्र आव्हाड- गृहनिर्माण
हसन मुश्रीफ- सहकार
नवाब मलिक- अल्पसंख्यांक

शिवसेना मंत्र्यांचे संभाव्य खातेवाटप
आदित्य ठाकरे- पर्यावरण, उच्च व तंत्रशिक्षण
एकनाथ शिंदे- नगरविकास, सार्वजिनक बांधकाम
अनिल परब- सीएमओ
उदय सामंत- परिवहन
सुभाष देसाई- उद्योग आणि खनिकर्म

काँग्रेसच्या मंत्र्यांचे संभाव्य खातेवाटप
अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम
बाळासाहेब थोरात – महसूल खाते

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर लगेच खातेवाटप होईल अशी अपेक्षा सर्वांना होती मात्र अद्याप खातेवाटप झालेले नाही. खातेवाटपाबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा असून गुरुवारी संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल म्हटलं होतं.

पोलीसनामा फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like