उपमुख्यमंत्री सकाळी 6 वाजताच पुणे मेट्रो कामाच्या पाहणीला

पोलिसनामा ऑनलाईन – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल बहुतांश अधिकार्‍यांना माहिती आहे. त्यांच्याकडून वेळेआधीच सर्व कामांच्या पाहणीचा तडाखा दिला जातो. आज सकाळी पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करण्यासाठी ते सकाळी सहा वाजता कामावर पोहचले. पिंपरी-चिंचवड ते पुणे मेट्रोचा आढावा घेत पवारांनी मेट्रोचे मुख्य अधिकारी ब्रिजेश दीक्षित यांच्यासोबत बैठक घेतली.

पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करण्यासाठी पवार भल्या सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फुगेवाडी येथे दाखल झाले होते. बैठक झाल्यानंतर पवार यांच्या गाड्यांचा ताफा संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकाकडे वळाला. मेट्रोचे आढावा घेतल्यानंतर मेट्रोचे पहिले तिकीट हे राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांना देण्यात आले. संत तुकाराम नगर ते पिंपरी (खराळवाडी) असा मेट्रोने त्यांनी प्रवास केला. यावेळी त्यांनी मेट्रो चालकाच्या केबिनमधून आढावा घेतला. तर ब्रिजेश दीक्षित त्यांना मेट्रोबद्दल माहिती देत होते. पाहणी दौर्‍यात मोजके पोलीस अधिकारी आणि मेट्रो कर्मचारी उपस्थित होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like