अजित पवारांना कोरोनाची लागण नाही, मुलगा पार्थ यांनी केलं अफवांचं खंडन !
पोलीसनामा ऑनलाईनः राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण (deputy-cm-ajit-pawar-not-corona-positive) नसल्याचे पार्थ पवार (Parth Pawar) यांनी स्पष्ट केले आहे. पवार यांना गेल्या चार दिवसांपासून अंगदुखी, ताप येत आहे. त्यामुळे पवारांनी सर्व दौरे रद्द करून मुंबईतील घरीच विश्रांती घेतली आहे. दरम्यान अजित पवारांना कोरोनाची लागण झाल्याच्या वृताने खळबळ उडाली होती. मात्र अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी या वृत्ताचे खंडण केले आहे. त्यांनी पवारांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे एका वृत्तवाहिनीला सांगितले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली असून सुदैवाने ही चाचणी निगेटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते घरीच थांबून विश्रांती घेत आहेत. शनिवारी अजित पवार यांनी बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसाग्रस्त भागाची पाहणी केली. मात्र बुधवारी त्यांनी दौरे रद्द केले होते. पुलामुळे बाधित रस्ते, पुलांच्या दुरुस्तीचे कामे करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. पंढरपूर येथील दौरा आटोपल्यानंतर पवारांना कणकण जाणवू लागली. त्यानंतर त्यांना ताप आला. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल निगेटिव्ह आला. परंतु खबरदारी म्हणून ते घरीच विश्रांती घेत आहेत.
सुप्रिया सुळेंनाही सांगितले दूरच थांबा
दरम्यान दोन दिवसापूर्वी अजित पवार यांना अंगदुखी, ताप आदी लक्षणे जाणवत होती. त्यामुळे त्यांनी सुप्रिया सुळे सोबतच्या बैठकीत लांब बसण्यास सांगितले होते. तसेच पवार हे स्वतः बैठकीत लांबून मार्गदशर्न करत होते.