अजित पवारांनी दिला पोलिसांना सल्ला, म्हणाले – ‘प्रीवेडिंगवाल्यांना अडवू नका, हनिमूनसाठी पण इथंच आले पाहिजेत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – “आजकाल लग्न ठरलं की प्रीवेडिंग शूटिंग केलं जातं. यासाठी अनेक मुलं मुली श्रीवर्धनमध्ये येतात. शूटिंगसाठी येणाऱ्या या मुलांमध्ये वाद झाल्याचं ऐकायला येत. त्यांना इथे रोखलं जातं. ही प्रकरणं पोलीस ठाण्यापर्यंत जातात. पण तसं करु नका. प्रीवेडिंगला आलेल्या जोडप्याला इतकी चांगली वागणूक द्या की नंतर त्यांनी हनिमूनलाही येथेच आलं पाहिजे. हनिमून झाल्यावर लग्नाच्या पहिल्या वाढदिवसालाही येथेच आलं पाहिजे. त्यासाठी मार्गदर्शन, सहकार्य, संरक्षण द्यायला हवं. यामुळे उत्पन्नाचं साधन तयार होईल,” असं सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पोलिसांनी दांपत्यांना चांगली वागणूक देण्याचा सल्ला दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सध्या रायगड – श्रीवर्धन दौऱ्यावर आहेत. यावेळी कार्यक्रमातील भाषणादरम्यान बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

दरम्यान, शरद पवारांनी अनेक वादळं पाहिली असून कोकणाचा कॅलिफोर्निया करावा ही त्यांची इच्छा असल्याचंही अजित पवार यावेळी म्हणाले. “कोकणाबद्दल शरद पवारांनाही आत्मियता आहे. या भूमीवर त्यांचं खूप प्रेम आहे. या परिसराचा कॅलिफोर्निया करण्याची त्यांची इच्छा आहे. कोकण रेल्वे शरद पवारांच्या दूरच्या दृष्टीने मधु दंडवतेंची मदत घेऊन आली. त्यावेळी पहिल्यांदाच राज्य सरकारच्या वतीने निधी देण्याचं काम शरद पवारांनी केलं. शरद पवारांनी अनेक हल्ले, वादळं, दुष्काळ, गारपीट पाहिली, पण त्यातून न डगमगता राज्यातील जनतेला उभं करण्याचं काम केलं,” असंही ते म्हणाले.

लागेल ती मदत करु – उपमुख्यमंत्री अजित पवार
“आमचीच मुलगी येथे आमदार असून बापाच्या नात्याने तिला पैसे कमी पडू देणार नाही.
तुम्ही काळजी करु नका. आम्हा सर्वांचं लक्ष असून लागेल ती मदत करु.
अदिती चांगलं काम करत आहे.
ती कमी पडली की तिचा बाप माझ्या डोक्यावर येऊन बसतो,” असा मिश्किल चिमटा अजित पवार यांनी यावेळी काढला.
“दिलेला पैसा घेतलेल्या कामासाठीच खर्च झाला पाहिजे. कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे. ब्रिटिशांचं काम टिकतं आपलं का टिकत नाही,” अशी समजही यावेळी अजित पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली.

READ ALSO THIS :

LIC कन्यादान पॉलिसी : जमा करा केवळ 130 रुपये, मुलीच्या लग्नासाठी मिळतील पूर्ण 27 लाख, जाणून घ्या कसे?

दुसर्‍या खुनातून पहिल्या खुनाचा झाला ‘उलघडा’ ! 2 खुन, एक मृत्यु आणि एका आत्महत्येला ठरला ‘तो’ कारणीभूत