राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

प्रयागराज : वृत्तसंस्था – अयोध्यामध्ये उभारत असलेल्या भव्य राम मंदिराच्या बांधकामाच्या सहकार्यासाठी निधी संग्रह अभियान राबवले जात आहे. निधी संग्रह अभियानांतर्गत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून अनेक दिग्गजांनी दान दिले आहे. तर आता उत्तर प्रदेशचे डेप्युटी सीएम केशव प्रसाद मौर्य यांनी सुद्धा राम मंदिर बांधकामासाठी वर्गणी दिली आहे. मौर्य यांनी अयोध्यामध्ये राम मंदिर बांधकामासाठी 30 महिन्याचे वेतन दिले आहे. ही रक्कम शनिवारी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि सदस्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांच्याकडे सोपवण्यात आली. पत्रकारांशी बोलताना मौर्य म्हणाले, मी सर्वप्रथम एक रामभक्त आहे, नंतर राज्याचा उपमुख्यमंत्री आहे.

याशिवाय डेप्युटी सीएमने मंदिर बांधकामासाठी राज्याच्या पीडब्ल्यूडी कर्मचार्‍यांकडून 1.10 कोटी रुपयांचा एक चेक सुद्धा दिला. त्यांनी म्हटले, राम मंदिराच्या बांधकामासाठी संपूर्ण देशातून सहकार्याची मागणी केली जात आहे, कारण यासाठी पाच पिढ्यांनी आपली आहुती दिली आहे. अशा परिस्थितीत सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्यामध्ये राम मंदिराच्या बांधकामासाठी मागील वर्षी ऑगस्टमध्ये भूमीपूजन केले होते. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनुसार, राम मंदिरच्या पायाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हे मंदिर 36 ते 40 महिन्यांच्या आत तयार होऊ शकते.

15 फेब्रुवारीपासून सुरू होऊ शकते बांधकाम
अयोध्याच्या श्री राम जन्मभूमी मंदिराचे बांधकाम पूर्णपणे 15 फेब्रुवारीपासून सुरू होईल. कारण तोपर्यंत मंदिराच्या पायाचे डिझाइन ट्रस्ट आणि बांधकाम एजन्सीला मिळेल. ज्या मंदिराच्या मॉडलवर बांधकाम होणार आहे त्या प्रकारच्या बांधकामासाठी जवळपास 300 ते 400 कोटी रुपये लागतील. परंतु मंदिर परिसराच्या बाहेर राम जन्मभूमी परिसरात एकुण बांधकामाचा विचार करता ही रक्कम 1100 कोटी रुपयांपर्यंत पोहचते. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद गिरी जी यांनी राम मंदिर बांधाकामासाठी होणार्‍या खर्चाची माहिती दिली होती.