पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयावर महिला राज

विनायक ढाकणे मुख्यालय उपायुक्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयाचे प्रशासकीय कामकाज पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी सुरू केले आहे. शहरातील उपायुक्त कार्यालयाच्या विभाजनानुसार पोलीस उपयुक्तांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये झोन एकसाठी उपायुक्त म्हणून स्मार्तना पाटील तर दोनसाठी नम्रता पाटील यांची नियुक्ती केली आहे. उपायुक्त विनायक ढाकणे यांची मुख्यालय येथे नियुक्ती केली असल्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी काढले आहेत.

झोन एक स्मार्तना पाटील यांच्याकडे सहायक पोलिस आयुक्त देहूरोड आणि पिंपरीचा समावेश आहे. देहूरोडमध्ये देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, निगडी पोलीस ठाणे तर पिंपरी विभागात पिंपरी, चिंचवड, भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्याचा समावेश आहे.
झोन दोन उपायुक्त नम्रता पाटील यांच्याकडे वाकड आणि चाकण सहायक पोलिस आयुक्त यांची हद्द आहे. वाकडमध्ये वाकड, हिंजवडी, सांगवी तर चाकणमध्ये दिघी, आलंदी, चाकण आणि चिखली पोलीस ठाण्याचा समावेश आहे.
[amazon_link asins=’B0798R8SZH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3f9c1541-995a-11e8-971e-83c7d678765d’]
उपायुक्त ढाकणे यांना मुख्यालय देण्यात आले आहे. यामध्ये गुन्हे शाखा, वाहतूक विभाग, प्रशासकीय विभागाचा समावेश असण्याची शक्यता आहे. पोलीस उपायुक्त बदल्या झाल्याने कामाला वेग येणार आहे. तर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी त्यांचा पदभार सोडला आहे.

खालील लिंकच्या सहाय्याने पोलीसनामाचे फेसबूक पेज लाईक करा
https://www.facebook.com/policenama/