Deputy Commissioner Varsha Ladda-Untwal | प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने G-20 बैठकीचे आयोजन यशस्वी करावे – उपायुक्त वर्षा लड्डा-ऊंटवाल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  Deputy Commissioner Varsha Ladda-Untwal | जी-२० प्रतिनिधी (G20 Summit Pune) बैठकीच्या पूर्वतयारीत सर्व प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम समन्वय राखत आयोजन यशस्वी करावे, असे आवाहन महसूल उपायुक्त वर्षा लड्डा ऊंटवाल यांनी केले.

पुणे येथे १२ ते १४ जून दरम्यान आयोजित ‘डिजिटल इकोनाॅमी वर्किंग ग्रुप’ बैठकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात (Divisional Commissioner Office Pune) आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakane), नगरपालिका प्रशासन सह आयुक्त पूनम मेहता (Municipal Administration Joint Commissioner Poonam Mehta), महसूल उपायुक्त रामचंद्र शिंदे (Deputy Commissioner of Revenue Ramchandra Shinde), अपर जिल्हाधिकारी विकास मोरे (Additional Collector Vikas More) आदी उपस्थित होते.

बैठकीत जी-२० परिषदेनिमीत्त सुरक्षा व्यवस्था, पाहुण्यांचे स्वागत, सांस्कृतिक कार्यक्रम,
डिजिटल संकल्पनेतवर आधारित प्रदर्शन, ऐतिहासिक स्थळांना भेटी आदी विषयांचा आढावा घेण्यात आला
जी-२० बैठकीसाठी येणाऱ्या प्रतिनिधींच्या आगमनप्रसंगी विमानतळावर पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात
येणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीला विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title :   Deputy Commissioner Varsha Ladda-Untwal | Coordination of Administrative Agencies to Successfully Organize G-20 Meeting – Deputy Commissioner Varsha Ladda-Untwal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Lok Sabha Bypoll Election | ‘…तर मी पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार’, मनसे नेते वसंत मोरेंचं मोठं विधान

Palkhi Sohala 2023 – Pune Traffic Updates | श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल

ACB Trap Case News | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारी 17 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात