‘क्षर्णाधात’ भिंत ओलांडून पी. चिदंबरम यांना अटक करणार्‍या पोलिस अधिकार्‍यासह 28 CBI अधिकार्‍यांना ‘राष्ट्रपती पदक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अटक करणाऱ्या अधिकाऱ्यांसह २८ सीबीआय अधिकाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी राष्ट्रपतींचे पोलिस पदक प्रदान करण्यात आले. अधिका-यांनी सांगितले की, गेल्या वर्षी आयएनएक्स मीडिया प्रकरणात चिदंबरम यांना अटक करणार्‍या डेप्युटी एसपी रामास्वामी पार्थसारथी यांना राष्ट्रपती पोलिस पदक देण्यात आले आहे. पार्थसारथी यांनी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यालाही अटक केली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  सीबीआयचे सहसंचालक धीरेंद्र शंकर शुक्ला यांनाही विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलिस पदक देण्यात आले आहे. त्यांनी मुंबई स्थित पत्रकार जेडे यांच्या हत्येचा यशस्वीपणे तपास केला आणि युएईहून भारतीय नागरिक रोशन अन्सारी यांना भारतात आणणार्‍या संघाचे नेतृत्व केले. गुरमीत राम रहीमच्या अनुयायांचा समावेश असलेल्या प्रकरणाचीही त्यांनी चौकशी केली होती.

या अधिकाऱ्यांचाही गौरव  

प्रतिष्ठित सेवेसाठी पोलीस पदकाने सन्मानित झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये बिनय कुमार, मनोज वर्मा, निर्भय कुमार, रवि नारायण त्रिपाठी, मुकेश वर्मा, नितेश कुमार, बरुण कुमार सरकार, नारायण चंद्र साहू, नंद किशोर, नूर अली शेख आणि रोहिता कुमार धिनवा यांचा समावेश आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like