‘हनीप्रीत’नं गुफेत रात्र घालवली, डेर्‍यात शाह मस्तानच्या ‘बर्थडे’ची तयारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दोन वर्षानंतर हनीप्रीतला न्यायालयाने जामिन मंजूर केल्यानंतर हनीप्रीतने आपल्या समर्थकांसह आश्रमात प्रवेश केला. यावेळी हनीप्रीतने आश्रमातील राम रहीम यांच्या गुहेत हनीप्रीतने रात्र घालवल्याचे समजते यानंतर ती आपल्या कोठीमध्ये परतली आणि आश्रमातील आयोजकांची भेट घेतली आणि काही महत्वाच्या गोष्टींवर देखील चर्चा केली. यावेळी हनीप्रीतचे सोबत कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते. यावेळी हनीप्रीतने प्रसार माध्यमांपासून सुरक्षित अंतर ठेवल्याचे पहायला मिळाले.

डेरा प्रमुखांनी केला होता विवाह
माजी आमदार राहिलेल्या रुलिया राम गुप्ता यांचे नातू विश्वास याच्या सोबत हनीप्रीतचा विवाह आश्रमातच 14 फेब्रुवारी 1999 रोजी करण्यात आला होता. आमदार असलेल्या रुलिया गुप्ता यांचे आधीपासूनच डेराशी चांगले संबंध होते म्हणूनच डेरा प्रमुखांनी त्यांच्या नातवाशी हा विवाह लावून दिल्याचे समजते. मात्र सुरुवातीपासूनच हा विवाह वादाच्या भोवऱ्यात अडकलेला होता.

वडीलांचा होता टायरचा व्यवसाय
हनीप्रीत यांचे पिता रामानंद तनेजा आधी एम आर एफ टायरचे शोरूम चालवत होते ज्याचे नाव सच टायर्स असे होते. नंतर त्यांनी डेऱ्यामध्येच एक सीड प्लॅन तयार सुरु केला होता. हनीप्रीतच्या छोट्या बहिणीचे देखील गुरुग्राम येथे लग्न झाले होते. यामध्ये राम रहिमचचे खास योगदान होते. हनीप्रीतचे काका अजूनही एमआरएफ टायरचे शोरूम चालवतात. हनीप्रीतचे मामा देखील सिरसामध्ये व्यवसाय करतात.

मस्ताना महाराज यांच्या वाढदिवसाची चर्चा
लवकरच मस्ताना महाराज यांचा जन्मदिवस आहे डेरा प्रमुख जेलमध्ये गेल्यापासून या ठिकाणी कोणताही उत्सव साजरा झालेला नाही त्यामुळे या वेळी मस्ताना महाराज यांचा जन्म दिवस यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला जाणार आहे. हनीप्रीतने डेरामध्ये येताच जीर्णोधाराचे काम सुरु करण्यात आले होते.

डेरा प्रमुखानंतर हनीप्रीतच सर्वेसर्वा
राम रहीम यांच्यानंतर हनीप्रीत हीच डेरातील मुख्य व्यक्ती होती. हनीप्रीतनेच राम रहीमला चित्रपटात काम करण्यासाठी लॉंच केले होते. राम रहीम यांच्या अनेक चित्रपटाचे मालकी हक्क हनीप्रीतकडेच होते. तर हनीप्रीतने स्वतः अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले होते.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like