मालगाडी घसरल्याने मुंबईहून पुण्याला येणाऱ्या सर्व गाड्या तर पुण्याहून जाणाऱ्या ‘या’ गाड्या रद्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कर्जत – लोणावळा सेक्शनमधील घाटामध्ये मालगाडीचे डबे पहाटे साडेचार वाजता घसरल्याने मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली असून मुंबईहून पुण्याला येणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सिंहगड, डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेससह सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

कर्जतजवळील घाट परिसरातील जामरुंग व ठाकूरवाडी स्थानकादरम्यान मालगाडीचे काही डबे घसरल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही मालगाडी मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत होती. ती रुळावरुन घसरल्याने मुंबईकडून पुण्याला येणारी व घाटातील रेल्वे मार्ग हे दोन्ही प्रभावित झाले.

त्यामुळे मुंबईहून सकाळी सुटणाऱ्या मुंबई -पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, मुंबई -पुणे डेक्कन एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस अशा सकाळी पुण्याकडे येणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मुंबईहून येणारी इंद्रायणी एक्सप्रेस रद्द केल्याने तोच रेक पुणे सोलापूर एक्सप्रेसला वापरला जात असल्याने ही गाडी रद्द करण्यात आली आहे.

मुंबईहून सकाळी येणाऱ्या या गाड्या रद्द केल्याने आता पुण्याहून सायंकाळी मुंबईला जाणाऱ्या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस, भुसावळ एक्सप्रेस, पनवेल पुणे पॅसेंजर, डेक्कन एक्सप्रेस या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

काही वेळापूर्वी मधल्या रेल्वे लाईनवरील साहित्य बाजूला करण्यात रेल्वेला यश आले असून आता या मधल्या मार्गावरुन लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसामुळे मुंबई पुणे दरम्यानच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यात या अपघातामुळे आता सर्वच गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्यांना दांडी लागणार आहे.

मुंबई पुणे दरम्यान दररोज ये-जा करणाऱ्या असंख्य लोकांना रेल्वे स्टेशनवर गेल्यावरच गाड्या रद्द झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे काहीनी पर्यायी महागड्या शिवशाहीकडे, एशियाडचा पर्याय निवडला. पण तेथेही मोठी रांग लागली होती. त्यामुळे अनेकांनी शेवटी घरचा रस्ता पकडला.

अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा

व्यायाम केल्यास ‘मधुमेहात’ होऊ शकते सुधारणा

 ‘स्मरणशक्ती’ वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा

 ‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर