Desai Trophy | एच व्ही देसाई महाविद्यालयाने पटकावली देसाई करंडकची ‘चॅम्पियन ट्रॉफी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Desai Trophy | एच व्हीं देसाई महाविद्यालयात 31 मार्च व 1 एप्रिल रोजी 2 दिवसीय ‘देसाई करंडक’ (Desai Trophy) या अंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एच व्ही देसाई महाविद्यालयातील (HV Desai College) विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत ‘चॅम्पियन ट्रॉफी’ (Champions Trophy) सलग दुसऱ्यांदा पटकावली.

स्पर्धेचे उद्घाटन मराठी अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर (Mrunmayee Gondhalekar) आणि संस्थेचे उपाध्यक्ष जनक शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे सचिव हेमंत मणियार,उपसचिव दिलीप जग्गड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र गुरव तसेच सर्व शाखांचे उपप्राचार्य इतर शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

‘देसाई करंडक’ (Desai Trophy) स्पर्धेत सी चॅम्पियन,वेब मास्टर, डिबेट, काउंटर स्ट्राइक, Ad-Mad, थ्री मिनिट्स मूवी क्लिप अशा टेक्निकल व नॉन टेक्निकल स्पर्धांचा समावेश होता. विद्या प्रतिष्ठान बारामती (Vidya Pratishthan Baramati), वीसीएसीएस, सिंहगड इन्स्टिट्यूट (Sinhagad Institute), मॉडर्न कॉलेज (Modern College) इत्यादी महाविद्यालयातील 250 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.

स्पर्धेतचे आयोजक असलेल्या एच व्ही देसाई महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत
‘चॅम्पियन ट्रॉफी’ सलग दुसऱ्यांदा पटकावली.
पूना गुजराती केळवणी मंडळाचे अध्यक्ष राजेश शहा व जागतिक ख्याती असलेले आयटी अभियंता आणि
प्रसिद्ध लेखक डॉक्टर दीपक शिकारपूर (Deepak Shikarpur) यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके दिली.
उपप्राचार्य सोनी, प्राध्यापिका ज्योती मालुसरे आणि स्वप्निल सांगोरे यांनी स्पर्धेचे समन्वयक म्हणून काम पाहिले.

Web Title :-  Desai Trophy | HV Desai College wins Desai Cup ‘Champion Trophy’
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Uddhav Thackeray | ठाण्यातील प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात; म्हणाले – ‘फडणवीस फडतूस, गृहमंत्री नव्हे तर हे तर गुंडमंत्री’ (व्हडिओ)

Roshni Shinde | ‘गुंडगिरी करण्यासाठी मुख्यमंत्री झालात का?’, मारहाण झालेल्या रोशनी शिंदेचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Sinhagad Fort-Regional Tourism Scheme | प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत सिंहगड परिसर संवर्धनासाठी 3 कोटी 75 लाख मंजूर