कंडक्टरला ९ रूपयांसाठी केलेला ‘हावरटपणा’ पडला महागात, १५ लाखांचा ‘भूर्दंड’ !

गांधीनगर : वृत्तसंस्था – पैशांची हाव चांगली नाही, असं आपण नेहमीच म्हणतो. ती का ? याचे एक उदाहरणच समोर आले आहे. फक्त ९ रूपयांच्या हव्यासापोटी एका व्यक्तीला तब्बल १५ लाख रुपयांचा भूर्दंड पडला आहे. गुजरातमधील चंद्रकांत पटेल या व्यक्तीला हा भुर्दंड पडला आहे. चंद्रकांत पटेल हा कंडक्टर असून त्याने एका प्रवाशाचे ९ रुपये आपल्या खिशात टाकले होते. त्यावर ‘गुजरात स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन’ने या कंडक्टरविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली आहे. त्यानुसार त्याला तब्बल १५ लाख रुपयांवर पाणी सोडावे लागले आहे. तसंच त्याच्यावर कारवाई करत त्याच्या वेतनश्रेणीत मोठी कपात करण्यात आली आहे. तसंच त्याची सेवा पूर्ण होईपर्यंत वेतनाची रक्कम आहे तीच राहणार आहे.

५ जुलै २००३ रोजी चंद्रकांत पटेल यांनी चिखली ते अंबाच गावच्या मार्गावरील बसमध्ये असताना कुदवेल गावाजवळ तिकीट तपासणीस बसमध्ये चढला. त्यानंतर तेव्हा एक प्रवासी सोडून सर्व प्रवाशांकडे तिकीटे होती. तर ज्याच्याकडे तिकीट नव्हते त्या प्रवाशाने सांगितले की त्याने तिकिटाचे पैसे दिले पण कंडक्टरने तिकिट दिले नाही. त्यावर महिन्याभराने जीएसआरटीसीने विभागीय चौकशी केली. त्यात कंडक्टरला दोषी करार देण्यात आले.

कंडक्टरवर कारवाई करत वेतन कपातीची शिक्षा त्याला देण्यात आली होती. त्यानंतर त्याने औद्योगिक लवाद आणि गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली. चौकशीच्यावेळी रेकॉर्डवर जे पुरावे आहेत ते पाहता शिक्षेची गरज नाही असा युक्तीवाद पटेलच्या वकिलाने केला. छोटयाशा गुन्हयासाठी ही खूप गंभीर शिक्षा आहे. पटेलची ३७ वर्षांची सर्व्हिस बाकी आहे. वेतनश्रेणीमध्ये कपात आणि कायमस्वरुपी एकच वेतन यामुळे चंद्रकांत पटेलचे १५ लाख रुपयांचे नुकसान होणार आहे, असा युक्तीवाद त्याच्या वकिलाने केला. चंद्रकांत पटेलला याआधी ३५ वेळा तिकिटाच्या थकबाकीमध्ये पकडले होते, अशी माहिती जीएसआरटीसीच्या वकिलाने कोर्टात दिली. न्यायालयानेही पटेल यांनाच दोषी ठरवले.

दरम्यान, औद्योगिक लवाद आणि गुजरात उच्च न्यायालयानेही पटेल यांची याचिका फेटाळून लावत त्यांच्यावर जीएसआरटीसीने केलेली कारवाई तशीच ठेवण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –