Budget 2019 : अर्थसंकल्प सादर होताच सेन्सेक्स च्या आकड्यांमध्ये कमालीची घसरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज संसदेत अर्थसंकल्प जाहिर करण्यात आला. त्यापूर्वीच शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण होते, तसंच सेन्सेक्सचा दर वाढला होता. मात्र अर्थसंकल्प पूर्णपणे सादर केल्यानंतर शेअर बाजारात असलेला उत्साह कमी झाला आहे. सेन्सेक्सच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे एकंदर मोदींच्या या अर्थसंकल्पावर शेअर बाजारात नाराजी व्यक्त होत आहे.

बजेट सादर करण्यापूर्वी शेअर बाजारातील सेन्सेक्सचा अकडा ४०,००० च्या पार गेला होता. मात्र, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मात्र यात मोठी घसरण पाहायला मिळाली, दुपारी दीड वाजता सेन्सेक्समध्ये सुमारे ३५३.३५ अंकांनी म्हणजेच ०.८९ टक्क्यांनी घसरण झाली. मात्र आता सेन्सेक्स ३९५५४.७१ अंकांवर पोहोचला आहे. तर निफ्टीमध्येही १२३.२५ अंकांची अर्थात १.०३ टक्क्यांची घसरण झाली आहे.

सकाळी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १०६.९९ अंकांनी वाढला होता. तेव्हा सेन्सेक्स ४०,०१५.०५ अंकांवर होता. तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक निफ्टी ३२.१० अंकांनी अर्थात ०.२७ टक्क्यांनी सुधारत ११,९७८.८५ अंकांवर पोहोचला होता. मात्र अर्थसंकल्प सादर होताच हे चित्र बदलले. वाढलेल्या आकड्यामध्ये कमालीची घसरण झाली.

दरम्यान, अर्थसंकल्पात बँक आणि एनबीएफसी बाबत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी अनेक उपाय केले आहेत. तसेच सेबीचे किमान पब्लिक शेअर होल्डिंग २५ टक्क्यांवरुन ३५ टक्के करण्याचे यात सांगण्यात आले आहे. सरकारी बँकांना ७० हजार कोटी रुपये देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. एवढ्या सुविधा करूनही अनेक मुद्द्यांवर अनेकांचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे शेअर बाजारात अर्थसंकल्पाविषयी नाराजी दिसत आहे.

‘नासलेलं दूध’ही आहे सौंदर्यवर्धक ; जाणून घ्या फायदे

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय

काय सांगताय ! मेहंदी केवळ ‘सौंदर्यच’ नाही तर ‘आरोग्यही’ खुलवते

मेंदूलाही असते व्यायामाची गरज, मानसिक उर्जेसाठी आवश्यक

पावसाळ्यात घ्या अशी काळजी, अरोग्य राहील चांगले