Desi Ghee | या ३ प्रकारच्या लोकांनी खाऊ नये देशी तूप, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

पोलीसनामा ऑनलाइन टीम – दुग्धोत्पादनात भारताचा नेहमीच अव्वल यादीत समावेश केला जातो, कारण खेड्यापासून शहरांपर्यंत दुभत्या जनावरांची येथे कमतरता नाही. देशी तूप खाण्याचे (Desi Ghee) येथे प्रमाण खूप जास्त आहे. देशी तूप (Desi Ghee) हे रोटी, खिचडी, डाळ यांसारख्या पदार्थांसोबत खाल्ले जाते. अनेक आरोग्य तज्ज्ञ ते स्वयंपाकाच्या तेलासाठी एक आरोग्यदायी पर्याय मानतात आणि त्याला सुपरफूडचा दर्जा देतात कारण ते केसांपासून त्वचेपर्यंत सर्वांसाठी फायदेशीर आहे (Who Should Not Eat Desi Ghee).

 

देशी तूप खाणे फायदेशीर की हानिकारक?
(Desi Ghee) देशी तूप खाण्याचे फायदे तुम्ही अनेकदा ऐकले असतील, जे खरे आहेत, पण काही बाबतीत त्याचे तोटेही आहेत. सर्व प्रथम, ते मर्यादित प्रमाणात खाल्ले पाहिजे आणि हे सर्वांसाठी फायदेशीर आहे असे नाही. कोणत्या वैद्यकीय परिस्थितीत आपण देशी तूप सेवन करू नये ते जाणून घेऊया.

देशी तूप (Desi Ghee) कुणी खाऊ नये?
भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ज्ञ निखिल वत्स यांनी सांगितले की, देशी तुपाचे सेवन काही लोकांसाठी हानिकारक ठरू शकते, जे खालीलप्रमाणे आहेत.

१. जर तुम्ही ऑफिसमध्ये ८ ते १० तास बसून काम करत असाल आणि शारीरिक हालचाली करत नसाल तर त्यांच्यासाठी देशी तुपाचे सेवन योग्य नाही.

२. ज्यांना हाय कोलेस्ट्रॉलची समस्या आहे, त्यांनी देशी तुपापासून दूर राहावे, कारण यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.

३. जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास होत असेल तर देशी तूप टाळा कारण ते तुमचे आरोग्य बिघडवू शकते.

 

या लोकांसाठी देशी तूप फायदेशीर

१. जे तासन् तास वर्कआउट किंवा शारीरिक हालचाली करतात त्यांच्यासाठी तूप खाणे फायदेशीर ठरू शकते.

Advt.

२. जे लोक असे काम करतात ज्यामध्ये खूप धावपळ करावी लागते, त्यांच्यासाठी देशी तूप खाणे योग्य आहे.

३. जे अंगाने बारीक आहेत आणि वजन वाढवू इच्छितात त्यांना तुपाच्या सेवनाने इच्छित परिणाम मिळू शकतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Desi Ghee | who should not eat desi ghee side effect high cholesterol obesity with no physical activities

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

CM Eknath Shinde | ‘बोम्मईंच्या नावानं खोटं ट्विट, त्यामागे कोणता पक्ष हेही समजले’, मुख्यमंत्र्यांची सभागृहात माहिती

Bank Rules Change | १ जानेवारीपासून बदलणार बँकेचे हे नियम, जाणून घ्या तुमच्यावर कोणता परिणाम होणार

Ankita Lokhande | टीव्ही इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेचे बोल्ड फोटो होताहेत व्हायरल