बाळाच्या प्रश्नावर ‘देसी गर्ल’ प्रियंकानं सोडलं ‘मौन’ ! म्हणाली – ‘कुटुंब वाढवायचंय परंतु…’

पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूड स्टर प्रियंका चोपडा एक इंटरनॅशनल अ‍ॅक्ट्रेस म्हणून ओळखली जाते. तिनं अमेरिकन शो क्वांटिको मधून हॉलिवूड डेब्यू केला आहे. यो शोमध्ये तिला खूप पसंती मिळाली होती. यानंतर तिनं हॉलिवूड सिनेमात काम केलं. आपल्या खासगी गोष्टींमुळं प्रियंका नेहमीच चर्चेत राहिली आहे.

प्रियंका आणि तिचा पती हॉलिवूड सिंगर निक जोनास यांची गिनती बॉलिवूडमधील फेवरेट सेलेब्समध्ये केली जाते. आपल्या फोटोंमुळे आणि रोमँटीक केमिस्ट्रीमुळं प्रिंयका नेहमीच चर्चेत येताना दिसत असते. अलीकडेच तिला बाळाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिनं यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. एका ब्रिटीश मॅगेझिनसोबत प्रियंका बोलत होती.

 

प्रियंका म्हणाली, “2020 मध्ये मी माझ्या वर्क कमिटमेंट्समध्ये बिजी आहे. एक कुटुंब असणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हे असं काही आहे जे मला निश्चितपणे हवंच आहे आणि मला करायचं आहे. जेव्हा देवाची इच्छा असेल तेव्हा योग्य वेळ आल्यानंतर हेही होईल.” असं ती म्हणाली.

https://www.instagram.com/p/B92VToGBIyY/

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती व्हाईट टायगर सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव असेल. अशीही माहिती आहे की, पीसी(प्रियंका) संजय लीला भन्साळींच्या बैजू बावरा या आगामी सिनेमात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अॅमेझॉन स्टुडिओजच्या शीला या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात ती मां शीला आनंदची भूमिका साकारणार आहे. असंही म्हटलं जात आहे की, हॉलिवूडच्या मॅट्रीक्स 4 या सिनेमातही ती काम करण्याची शक्यता आहे.

 

https://www.instagram.com/p/BxoRlc3BRqg/

https://www.instagram.com/p/Bw8fd6AgLnU/

https://www.instagram.com/p/BxJG9w6glcd/

https://www.instagram.com/p/Bvcq3C7ge12/

https://www.instagram.com/p/Btr4p2CgOaC/

https://www.instagram.com/p/B6x_1_wB94m/