‘लॉकडाऊन’मध्ये लॉस एंजेलिसमध्ये अडकली ‘देसी गर्ल’ प्रियंका ! डंबल न मिळाल्यानं ‘असं’ केल वर्कआऊट (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन –सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडा सध्या आपल्या पती सोबत लॉस एंजेलिसमध्ये सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे. प्रियंकानं वर्काआउट करण्यासाठी खास शक्कल लढवली आहे ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

प्रियंकानं नुकताच तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ती वर्कआउट करत आहे. परंतु तिला डंबल न मिळाल्यानं तिनं खास शक्कल लढवली आहे. प्रियंकानं तिची पुतणी कृष्णाला उचलत डंबल प्रमाणे धरून तिचं वर्कआऊट केलं आहे. व्हिडीओ शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. व्हिडीओ शेअर करताना प्रियंका म्हणते, “जीम नहीं, कोई बात नहीं.”

https://www.instagram.com/p/B_kFzOpBHgl/

प्रियंकाचं हे अनोख वर्कआऊट पाहून चाहतेही खूप प्रभावित झाले आहेत. या व्हिडीओला अद्याप 57 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. अनेकांनी यावर कमेंटही केली आहे. काहींनी तिला सर्वात उत्तम वर्कआऊट असंही म्हटलं आहे. एकानं तर खूप हे खूप सुंदर असल्याचंही म्हटलं आहे.

https://www.instagram.com/p/Bo5pObvgQwJ/

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती व्हाईट टायगर सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव असेल. अशीही माहिती आहे की, पीसी(प्रियंका) संजय लीला भन्साळींच्या बैजू बावरा या आगामी सिनेमात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अॅमेझॉन स्टुडिओजच्या शीला या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात ती मां शीला आनंदची भूमिका साकारणार आहे. असंही म्हटलं जात आहे की, हॉलिवूडच्या मॅट्रीक्स 4 या सिनेमातही ती काम करण्याची शक्यता आहे.

https://www.instagram.com/p/BoW6G1zFrzD/

https://www.instagram.com/p/BoW6TLoFPr3/

https://www.instagram.com/p/B-MN5ARJ2NZ/

https://www.instagram.com/p/B-LtsqKJV5x/

https://www.instagram.com/p/B-JGny1Jy-D/

https://www.instagram.com/p/B-JGaF0JAzt/

https://www.instagram.com/p/B-JGO8mpeF1/

https://www.instagram.com/p/B-JGKh9pq3h/

https://www.instagram.com/p/B-HPylkJPBt/

https://www.instagram.com/p/B935HnSpChu/

https://www.instagram.com/p/B8wBc74JgEh/

https://www.instagram.com/p/B8JKRgNp8l6/