गँगस्टर्सच्या मदतीनं भारतात दहशतवादी हल्ले करण्याची तयारी, ISI आणि पाकिस्तानी आतंकवादी ग्रुपच्या नव्या कटाबद्दल यंत्रणा ‘अलर्ट’वर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आएसआय आणि पाकिस्तानच्या दशहतवादी संघटनांच्या नव्या कारस्थानांनी भारतीय सुरक्षा यंत्रणांचे आव्हान वाढवले आहे. सुरक्षादले आणि सुरक्षा यंत्रणांच्या दक्षतेमुळे भारतात हल्ले करू शकत नसल्याने बेचैन असलेल्या आयएसआय आणि दहशतवादी संघटनांनी रक्तपाताच्या नव्या खेळाचा प्लॅन केला आहे. आपली कारस्थाने घडवून आणण्यासाठी लोकल गँगस्टर्सचा आधार घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. नुकतेच चंदीगढ इंटेलिजन्स युनिटने सर्व इंटेलिजन्स एजन्सी युनिटला दहशतवादी-गँगस्टर आघाडीबाबत सावध केले आहे.

काही गँगस्टर्सचे नाव देत इंटेलिजन्स विंगने म्हटले आहे की, आयएसआय आणि दहशतवादी गट या गँगस्टर्ससोबत संपर्कात आहेत आणि त्यांना भारतात हल्ले घडवून आणण्याचा टास्क देत आहेत. यामध्ये काही फरार आरोपी आहेत, तर काही जेलमध्ये बंद आहेत. एका वरिष्ठ अधिकार्‍याने म्हटले की, अशी शक्यता आहे की, आयएसआयएस अतिशय प्रभावी पद्धतीने या गँगस्टर्सशी संपर्क करू शकते, किंवा अगोदरपासून संपर्कात आहे. सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीच्या पंजाब युनिटने काही दिवसांपूर्वी पाठवलेल्या अलर्टमध्ये म्हटले आहे की, आएसआय आणि दुसर्‍या दहशतवादी गटांनी 5 गँगस्टर्सना काही नेत्यांना टार्गेट करण्याचा टास्क दिला आहे.

या पाच गँगस्टर्सपैकी 2 फरार आहेत. तर तीन पंजाबच्या विविध जेलमध्ये बंद आहेत. हे गँगस्टर्स अनेक हत्या, लूटमार, अंमली पदार्थांची तस्करी आदीचे जेलमधून रॅकेट चालवत आहेत. स्थानिक पोलीसांना या गँगस्टर्सवर लक्षण ठेवण्यास सांगितले आहे. एका अधिकार्‍यानुसार, आएसआयला ही रणनिती यासाठी बनवावी लागली, कारण ज्या स्थानिक स्लीपर सेलवर दहशतवादी अवलंबून होते, आता ते त्यांच्यासाठी काम करत नाहीत. कारण सुरक्षा दलांकडून मारले जाण्याची त्यांना भिती आहे. लोकल स्लीपर सेल कंट्रोल करण्यासाठी कुणी टॉप लेव्हल कमांडरही आता शिल्लक नाही.