इतक्या कमी कमाईत रिया चक्रवर्तीनं मुंबईत खरेदी केल्या 2 प्रॉपर्टी, ED नं सुरू केला तपास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   सुशांत सिंह मृत्यूप्रकरणात रिया चक्रवर्तीवर अंमलबजावणी संचालनालयाने फास आवळण्यास सुरूवात केली आहे. ईडी या प्रकरणात ’मनी ट्रेल’ (पैशांचा खर्च) चा तपास करत आहे. ईडी सूत्रांकडून समजले की, मागील काही वर्षांत रियाची नेट कमाई 10 लाख ते 12 लाख आणि नंतर 14 लाखांवर पोहचली. ईडी सूत्रांनी इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) च्या संदर्भाने ही माहिती दिली आहे.

ईडीला समजले आहे की, खुप कमी कमाई असताना रिया चक्रवर्तीने मुंबईत दोन प्रॉपर्टी खरेदी केल्या आहेत. यामध्ये एक रियाच्या नावावर तर दुसरी प्रॉपर्टी घरातल्यांच्या नावावर घेतली आहे. अजून पर्यंत हे समजले नाही की, रियाच्या या दोन प्रॉपर्टीसाठी पैसे कुणी भरले. काही तरी गडबड झाल्याचे वाटत असल्याने ईडीने या दोन प्रॉपर्टीचे पेपर्स मागितले आहे. गुरुवारी हे कागदपत्र ईडीला मिळतील.

या प्रकरणात सुशांत सिंह राजपूतच्या दोन कंपन्यांची पडताळणी करण्यात आली आहे. आणखी एक कंपनी जी दिल्लीमध्ये आहे, तिची चौकशी अजून बाकी आहे. काही दिवसांपूर्वी ईडीने सुशांत सिंहच्या सीएकडे याबाबत चौकशी केली होती. परंतु, सीएच्या उत्तराने ईडीचे समाधान झालेले नाही. प्रॉपर्टीसंबंधी पुढील चौकशीसाठी ईडीने रियाला ई-मेल पाठवला आहे. मात्र, यावर अजून कोणतेही उत्तर मिळालेले नाही.

रिया चक्रवर्तीला 7 ऑगस्टला चौकशीसाठी बोलावण्यात आला आहे, ज्यामध्ये तिचा जबाब घेतला जाईल. रियाचा भाऊ शोविकला बोलावण्याची तयारी आहे, कारण तो सुशांतसोबत दोन कंपन्यांमध्ये डायरेक्टर होता. शोविकचे जबाबसुद्धा पुढील आठवड्यात नोंदले जाऊ शकतात. रियाचा चार्टर्ड अकाऊंन्टट रितेश शाहला जबाबासाठी बोलावण्यात आले आहे. यापूर्वी ईडीने सुशांतच्या सीएला बोलावून 11 तास चौकशी केली.