COVID-19 : सर्व काळजी घेऊन देखील ‘कोरोना’ची कशी झाली लागण ? हे आहे ‘कारण’, जाणून घ्या

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – सध्या कोरोना व्हायरसचा प्रसार वाढत असल्यामुळे सर्व लोक कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी मास्कचा वापर काटेकोरपणे करत आहे. त्याचबरोबर हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे त्याचबरोबर सामाजिक अंतराचे देखील पालन करत आहे. एवढी काळजी घेऊन देखील कोरोना वाढताना दिसत आहे. या वाढत्या प्रसाराचे नेमके काय कारण असू शकते असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. आता याबद्दल तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना मेडॉर हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉ. मनोर शर्मा यांनी सांगितले आहे की, कोरोना व्हायरसपासून आपला बचाव करण्यासाठी ग्लोव्ह्ज, मास्क, सॅनिटायझर वापर करतात हे त्यांचे प्राथमिक पाऊल आहे. कोरोनापासून आपला बचाव करण्यासाठी आपल्याला अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.

डॉ. शर्मा म्हणाले की, ‘आता अनेक ऑफिस खुले झाले आहे. ऑफिसमध्ये लोक जेवण करण्यासाठी, चहा पिण्यासाठी ऑफिसमध्ये जी भांडी असतात तिच वापरतात. याच वाईट सवयीमुळे कोरोनाची लागण होऊ शकते. याशिवाय ऑफिसमध्ये एकाच कॉम्प्यूटरचा वापर करतो. त्यामुळे देखील संक्रमण वाढू शकते. ऑफिसमध्ये असताना आपण एकत्र चहा पिण्यासाठी जमतो त्यामुळे सर्व चहऱ्यावरील मास्क काढतात त्यामुळे देखील कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आपण ऑफिसमध्ये टॉयलेटमध्ये जाताना दरवाजाला हात लावतो. या दरवाजावर देखील कोरोना व्हायरस असण्याची शक्यता असते.’

यापासून जर आपल्याला आपला बचाव करायचा असेल तर ऑफिसमध्ये शक्यतो चहासाठी एक कप घेऊन जा. शक्यतो जेवताना एकाच भांड्याचा वापर करा. त्याचबरोबर टॉयलेटमध्ये जाताना आपण जर दरवाजाला हात लावला असेल तर बाहेर आल्यानंतर सॅनिटायझर हाताला लावा. त्याचबरोबर सामाजिक अंतराचे पालन करा. अशी काळजी घेतल्याने कोरोनापासून आपला आपले संरक्षण करु शकता, असा सल्ला डॉ. शर्मा यांनी दिला आहे.