‘रणबीर-आलिया’चं डेस्टीनेशन वेडिंग ‘रद्द’ ! ‘या’ शहरात घेणार 7 फेरे

पोलीसनामा ऑनलाईन बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि आलिया भट यांची लव स्टोरही बॉलिवूडमधील चर्चित लव स्टोरीपैकी एक आहे. आलियाला आधीपासूनच रणबीर कपूर आवडतो. तेव्हा रणबीर मात्र कॅटरीना कैफसोबत रिलेशनशिपमध्ये होता. जेव्हा रणबीर आणि कॅट वेगळे झाले. रणबीरच्या जीवनात आलिया आली. नंतर दोघं एकमेकांना डेट करू लागले. असं वाटायला लागलं जसं काही नशीबाचीही हीच इच्छा होती.

गेल्या अनेक दिवसांपासून रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या बातम्या समोर येताना दिसत आहेत. असं सांगितलं होतं की, ब्रह्मास्त्र सिनेमानंतर दोघं डेस्टीनेशन वेडिंग करणार आहेत. आता अशी माहिती समोर येत आहे की, मुंबईमध्येच होणार आहे. फायनल व्हेन्यू म्हणून मुंबई डिसाईड झाली आहे. त्यामुळं आता रणबीर-आलिया मुंबईतच सात फेरे घेणार आहेत. डेस्टीनेशन वेडिंग न करता आता ते मुंबईतच विवाहबद्ध होतील. समोर आलेल्या माहितीनुसार डिसेंबरमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

अशी माहिती समजत आहे की, 21 डिसेंबर रोजी लग्नाचा सोहळा सुरू होईल आणि 4 दिवस चालेल. ऋषी कपूर यांची तब्येत आता ठिक आणि त्यामुळं लवकरच या नात्याला पुढच्या टप्प्यात नेण्यासाठी तयारी सुरू झाली आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ही जोडी अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र या सिनेमात काम करताना दिसणार आहे. याशिवाय आलिया भट करण जोहरच्या तख्त सिनेमातही दिसणार आहे. तिच्याकडे गंगुबाई काठियावाडी हा सिनेमाही आहे. रणबीर कपूरकडे शमशेरा हा आणखी एक सिनेमा आहे.