पुण्यातील भिक्षेकरी संस्थेत भिक्षेकरी महिलेस मारहाण 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

फुलेनगर येथील भिक्षेकरी संस्थेत एका भिक्षेकरी महिलेला कामगार महिलेकडून मारहाण करण्यात आली. या मारहाणीत भिक्षेकरी महिला जखमी झाली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8879b07d-bc1d-11e8-9c03-696a21d1d022′]

लता बन्सीलाल पालखे (रा. कामगार वसाहत, भिक्षेकरी संस्था फुलेनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी निलम राऊत (वय-७२) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुलेनगर येथे महिला व बाल विकास आयुक्तालयाअंतर्गत भिक्षेकरी केंद्र आहे. डेक्कन पोलिसांनी भिक्षेकऱ्यांवर केलेल्या कारवाईतील भिक्षेकरी न्यायालयाच्या आदेशाने येथे दाखल करण्यात आले आहेत. दहा भिक्षेकऱ्यांमागे एक कर्मचारी अशी येथील व्यवस्था आहे. येथे दि.8 सप्टेंबर रोजी फिर्यादी असलेल्या भिक्षेकरी महिलेची तेथील महिला कर्मचाऱ्याशी वादावादी झाली होती. या वादावादीत महिला कर्मचाऱ्याने संबंधीत भिक्षेकरी महिलेला काठिणे व हाताने मारहाण केली. यामध्ये तीच्या छातीला काठी लागल्याने जखम झाली होती. याप्रकरणी मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.