उच्चभ्रु सोसायटीत घरफोडी करणारा गुन्हे शाखेकडून जेरबंद

पुणे (हिंजवडी) : पोलीसनामा ऑनलाइन – हिंजवडी येथील फेज-३ मधील मेगापॉलीस या उच्चभ्रु सोसायटीमध्ये हाऊस किपींग आणि गाड्या धुण्याचे काम करणाऱ्या चोरट्याकडून पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून पाच लाख रुपये किंमतीचे १४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक लॅपटॉप जप्त केला आहे. ही कारवाई मेगापॉलीस सोसायटीजवळ करण्यात आली.

विकास गौतम सरोदे (वय-२४ रा. नांदगाव, ता. मुळशी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हिंजवडी परिसराती उच्चभ्रु सोसायटीमध्ये होणाऱ्या घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई जयभाये व सहायक पोलीस फौजदार वसुदेव मुंडे यांना उच्चभ्रु सोसायटीत चोरी करणारा मेगापॉलीस सोसायटीजवळ थांबला असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीकडे केलेल्या चौकशीत त्याने मेगापॉलीस सोसायटीमध्ये हाऊस किपींग आणि गाड्या धुण्याचे काम करत असताना सोसायटीमध्ये रात्री उशीरापर्यंत थांबून ज्या मालकाची गाडी पार्कींगमध्ये नाही किंवा गाडी धुण्यासाठी देलेल्या गाडीच्या चावी बरोबर असलेल्या फ्लॅटची चावी काढून त्याद्वारे चोरी केल्याची कबुली आरोपीने दिली. आरोपीकडून चार गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी ४ लाख ९१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-४ चे पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, पोलीस उप निरीक्षक हर्षल कदम, पोलीस कर्मचारी नारायण जाधव, धर्मराज आवटे, संजय गवारे, वसुदेव मुंढे, सुरेश जयभाये, आदिनाथ मिसाळ, लक्ष्मण आढारी, सुनिल गट्टे, गोविंद चव्हाण, तुषार काळे, धनाजी शिंदे, अजिनाथ ओंबासे यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त –