खुनाचा प्रयत्न करून फरारी झालेल्या संशयितास अटक

सांगली : पाेलीसनामा ऑनलाईन

खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात फरारी असलेल्या एका संशयिताला गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे. शहरातील संजयनगरमधी लव्हली सर्कल परिसरात हा गुन्हा घडला होता. सोहेल गफूर तांबोळी (२०, रा. हनुमाननगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B00DRLASZ6,B00KNN4N4I’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0ebba9c9-b2be-11e8-9fda-f3128b50dd3e’]

सहाय्यक निरीक्षक डोके यांच्या मार्गदर्शनाखाली मेघराज रूपनर, योगेश खराडे, सागर लवटे यांच्या पथकाने ही कारवाई केली. सोहेल तांबोळी आणि त्याचा साथीदार शाहरूख नदाफ याने १४ डिसेंबर २०१७ रोजी संजयनगर येथील लव्हली सर्कल येथे अमन मोकाशी याच्यावर खुनीहल्ला केला होता. शुक्रवारी दुपारी तो मंगळवार बाजार परिसरात येणार असल्याची पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष डोके यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. शुक्रवारी दुपारी पथकाने सापळा रचून त्याला अटक केली आहे. याबाबत संजयनगर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तांबोळी पसार झाला होता.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी

जाहिरात