Good News ! एका मिनिटात होणार ‘कोरोना’ विषाणूचा ‘खात्मा’, ‘या’ रसायनाचा लागला शोध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘इल्सव्हेअर जर्नल ऑफ हॉस्पिटल इन्फेक्‍शन’ या शोधपत्रिकेत नुकतेच प्रकाशित झाले आहे की कोरोनाग्रस्त पृष्ठभागाचे एका मिनिटात निर्जंतुकीकरण करणाऱ्या रसायनाचा शोध लावण्यात आला आहे, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. हे संशोधन युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिन ग्रीफस्वाल्ड, हायजीन अँड एन्व्हायर्मेंटल मेडिसिन इन्स्टिट्यूटमधील डॉ. जी. कम्प, डॉ. एस. पिफंडर आणि डॉ. डी. टॉड यांनी केले आहे.

कोरोना विषाणू सामान्य तापमानात जवळपास १ ते ९ दिवसांनी नष्ट होतो असे सांगण्यात येत आहे. परंतु हे रसायन फक्त एका मिनिटातच पृष्ठभाग निर्जंतुक करत असतो. या रसायनात इथेनॉल, हायड्रोजन पॅराॅक्‍सॉइड आणि सोडियम हायपोक्‍लोराईट आहे. या संशोधनासाठी सिव्हिअर अ‍ॅक्‍युट रेस्पायरेटरी सिंड्रोम (सार्स), कोरोना आणि मिडल ईस्ट रेस्पायरेटरी सिंड्रोम (मार्स) या प्रकारातील जवळपास २२ प्रकरणांचा अभ्यास करण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून या रसायनाचा वापर करण्यासाठी परवानगी देखील देण्यात आली आहे.

– कोरोना विषाणू सामान्य तापमानाला (३० अंश सेल्सिअस) एक ते नऊ दिवस जिवंत राहू शकतो. जर या विषाणूस पोषक वातावरण मिळाले तर तो जवळपास २८ दिवस जगू शकतो.

– जर तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर हा विषाणू फार काळ टिकू शकत नाही.

– या विषाणूचा पाच सेकंदात पृष्ठभागावरून संसर्ग होतो.

– सर्वसामान्यपणे तासाभरात तब्बल २३ वेळा मानवी त्वचेचा संपर्क हा हाताशी होत असतो. त्यातून पाच सेकंदात जवळपास ३१.६ टक्के विषाणू संसर्गित होत असतात.