बॅटरी बॉक्स व स्टील बेल्ट पार्सलची चोरी करणारे ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – नजर चुकवून बॅटरी बॉक्स आणि स्टील बेल्ट पार्सल चोरी करणाऱ्या तरुणासह अल्पवयीन मुलाला समर्थ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राहूल उर्फ पप्या संजय ससाणे (२१, मंगळवार पेठ), व त्याचा अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

समर्थ पोलिसांचे पथक परिसरताल तपासासाठी गस्त घालत असताना सायंकाळी साडेचारच्या सुमारास दोन जण ज्युपीटर दुचाकीवरून फुटरेसवर दोन बॉक्स नेताना दिसले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना संशयावरून सोमवार पेठ येथील भाजी मंडई परिसरात पकडले. त्यावेळी त्यांना दुचाकीच्या कागदपत्रे व लायसन्सची विचारणा केली. तेव्हा ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. त्यामुळे त्यांना त्या बॉक्सबद्दलही विचारणा केल्यावर त्यांनी ते सोमवार पेठेतील माळी महाराज मठाजवळ महाबली कुरियरकडून पहाटेच्या वेळी कुरियर पार्सचे लोडींग सुरु असताना त्यांची नजर चुकवून ते दोन बॉक्स चोरले असल्याचे सांगितले. त्यानंतर संबंधिक कुरियर सर्विसच्या मालकाकडे याची चौकशी केल्यावर त्यांना चोरीबद्दल माहीतीही नव्हती. त्यांच्याकडून ३५ हजार रुपये किंमतीचा चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.