40 हजारांपेक्षाही कमी किमतीत लाँच झाली इलेक्ट्रिक बाईक, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन – पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. इंधनाच्या रोजच्या दरवाढीचा फटका थेट खिशाला बसत असल्यामुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचा कल ई-बाईककडे दिसून येत आहे. अशातच Detel या कंपनीने शुक्रवारी (दि. 19) आपली इलेक्ट्रिक बाईक ईझी प्लस लाँच केली आहे. कंपनीने राईड एशिया एक्स्पोमध्ये ही बाईक लॉंच केली असून त्याचे बुकींगही सुरू झाले आहे. बाईकची विशेष बाब म्हणजे ही B2C बाईक ग्राहकांना www.detel-india.com या संकेतस्थळावर 1 हजार 999 रूपये देऊन खरेदी करता येऊ शकते.

Detel Easy Plus कंपनीच्या बाईकची किंमत 39,999 रूपये इतकी आहे. या टू व्हिलर बाईकमध्ये 170mm चा ग्राऊंड क्लिअरन्स मिळतो. तसेच लो स्पीड बाईकमध्ये 20AH लिथिअम आयन बॅटरी दिली आहे. तसेच 4 ते 5 ही बाईक संपूर्ण चार्ज होते. तसेच एकदा चार्ज केल्यानंतर 60 किलोमीटरपर्यंत ही बाईक चालवता येणार आहे. भारतातील रस्त्यांप्रमाणे ही बाईक डिझाईन केली असून यात मेटल अलॉय, पावर कोटेड आणि ट्युबलेस टायर दिले आहेत. कंपनीने ही बाईक 5 रंगात लॉंच केली आहे. यात मेटॅलिक रेड, पर्ल व्हाईट, गनमेटल, मेटॅलिक ब्लॅक आणि मेटॅलिक येलो हा कलर उपलब्ध आहे. Detel आपल्या प्रत्येक बाईकसह प्री पेड रोड साईड असिस्टंटही देत आहे. जर तुमची बाईक रस्त्याच्या मध्येच खराब झाली तर तुम्ही 844 844 0449 टोल फ्री क्रमांकावर कॉलही करू शकता. त्यानंतर कंपनीची एक गाडी तुमच्या मदतीला धावून येईल.