नळस्टॉप चौक व परिसरातील सर्व समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध : नगरसेविका मंजुश्री खर्डेकर

मोठ्या व्यासाची ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचे भूमीपूजन संपन्न....

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेली काही वर्षे होणारा त्रास आणि या वर्षी तर अति पावसामुळे नळस्टॉप चौक ते लॉ कॉलेज या महत्त्वाच्या रस्त्यावर वारंवार ड्रेनेज लाईन तुंबण्याच्या प्रकारामुळे नागरिकांना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागतो आहे. या ठिकाणी जुनी व अवघी ८ इंच व्यासाची ड्रेनेज लाईन अस्तित्वात होती. येथील गरज लक्षात घेऊन ही समस्या सोडवण्यासाठी मी २४ इंच व्यासाची लाईन टाकण्यासाठी बजेट तरतूद केली व आज या कामाचे भूमीपूजन होत आहे असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.

येत्या आठवड्यात मेट्रोचे अधिकारी व मनपा अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करुन नळस्टॉप चौकातील व कर्वे रस्ता आणि लॉ कॉलेज रस्त्याची दुरावस्था, स्टॉर्म वॉटर ड्रेन / पावसाळी लाईनची दुरावस्था यासह विविध समस्या सोडविणार असल्याचे ही नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या विकास निधीतून नळस्टॉप ते विधी महाविद्यालय या दरम्यान मोठ्या व्यासाची ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले त्या वेळी त्या बोलत होत्या. यावेळी स्थानिक नगरसेवक व प्रभाग समितीचे अध्यक्ष जयंत भावे, नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका माधुरीताई सहस्त्रबुद्धे, माजी नगरसेविका ऊर्मिलाताई आपटे, स्वीकृत सदस्य मिताली सावळेकर, शिरीष फडतरे, रवी देव, समीर काळकर, डॉ. पळणीटकर, जगदीश दिघे, नितीन आपटे, कुलदीप सावळेकर, राजेंद्र येडे, राज तांबोळी, बाळासाहेब धनवे, चंद्रकांत पवार, माणिकताई दीक्षित, ॲड.प्राची बगाटे, अमोल डांगे, अमोल शिनगारे, सुवर्णाताई काकडे, नारायण वायदंडे, किरण देखणे, सचिन साठे, कीर्ती गावडे व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भागातील अनेक वर्षांचा महत्त्वाचा विषय मंजुश्रीताईंनी मार्गी लावला व त्या सर्वच विषयात तक्रारींची तातडीने दखल घेतात याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. पण त्याच बरोबर पक्षातील जुन्या नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची दखल घेऊन त्यांना निमंत्रित करतात हे विशेष आहे असे मत माजी नगरसेविका ऊर्मिलाताई आपटे यांनी व्यक्त केले. शिवसेनेचे शिरीष फडतरे यांनी ही या परिसरातील समस्यांवर मंजुश्रीताई लवकरच उपाययोजना करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. नगरसेवक दीपक पोटे, जयंत भावे व माधुरीताई सहस्त्रबुद्धे यांनी ही मनोगत व्यक्त केले व चार ही नगरसेवक परस्पर समन्वयातून प्रभागाचा विकास साधत असून समस्या सोडवण्यासाठी तत्पर असल्याचे नमूद केले.

या प्रचंड वाहतुकीच्या आणि महत्त्वाच्या चौक आणि रस्त्यावर टप्याटप्याने काम केले जाईल जेणे करुन वाहतूक कोंडी होणार नाही असे संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले व याकामी नागरिक आणि वाहतूक पोलिसांचे ही सहकार्य मोलाचे असल्याचे सांगितले.

या प्रसंगी ऊर्मिलाताई आपटे, शिरीष फडतरे, समीर काळकर, रवी देव आणि डॉ. पळणिटकर यांच्या हस्ते या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक, नगरसेवक दीपक पोटे व जयंत भावे यांनी स्वागत तर संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन केले.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या