देव आनंद यांचा नातू ‘या’ चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण  

मुंबई : वृत्तसंस्था – दिवंगत जेष्ठ अभिनेते देव आनंद यांचा नातू  ऋषी आनंद लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अभिनेता गोविंदा यांचा गाजलेला ‘साजन चले ससुराल’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये ऋषीआनंद मुख्य भूमिकेत झळकणार आहे.’साजन चले ससुराल २’ असं या चित्रपटाचं नाव असणार आहे. गोविंदाच्या  ‘साजन चले ससुराल’ या चित्रपटाची निर्मिती करणारे  मन्सूर अहमद सिद्दीकी  हेच या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटामध्ये ऋषीसोबत चंकी पांडे, आर्य बब्बर, हेमंत पांडे, सोनल मोन्टेरिओ आणि इशिता राज यांच्याही मुख्य भूमिका असणार आहेत.
याचित्रपटा विषयी ऋषी  म्हणाला, ‘साजन चले ससुराल २’या  चित्रपटातून मी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा माझा पहिल्याच चित्रपट असून या चित्रपटासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. मात्र  मी या चित्रपटाविषयी अजून  फार काही सांगू शकत नाही
 ऋषी  आनंद हा अभिनेता आणि निर्माता सुनिल आनंद यांचा मुलगा आहे. देव आनंद  यांचा एकमेव मुलगा असलेल्या सुनिल आनंद यांनी ‘आनंद और आनंद’, ‘कार थिफ’ आणि मैं तेरे लिए या चित्रपटात काम केले होते. तसेच  त्यांनी ‘मास्टर’ आणि ‘वेगाटर मिक्सर’ या इंग्रजी सिनेमाचे दिग्दर्शनही केले आहे.
१९९६ मध्ये रिलीज झालेल्या ‘साजन चले ससूराल’ या  विनोदी चित्रपटात  गोविंदा, करिश्मा कपूर, तब्बू, कादरखान आणि सतीश कौशक यांसारखे कलाकार  या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटाचे  दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केले होते.तर  निर्मिती मन्सूर अहमद सिद्धीकी यांनी केली होती.
You might also like