Devarshi Narad Awards | देशविघातक शक्तींचा मुकाबला करण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वाची – राज्यपाल रमेश बैस

मुंबई : Devarshi Narad Awards | माध्यम क्रांतीच्या आजच्या युगात पारंपरिक माध्यमांपेक्षा प्रभावी मत परिवर्तक, व्हिडीओ ब्लॉगर्स व खासगी चॅनेल्सद्वारे निर्मित बातम्या व विश्लेषण पाहणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अपप्रचारांचा योग्य माहितीच्या आधारे सर्व माध्यमातून मुकाबला करून राष्ट्रहित जपणे आवश्यक आहे. या दृष्टीने माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस (Maharashtra Governor Ramesh Bais) यांनी आज येथे केले. (Devarshi Narad Awards)

विश्व संवाद केंद्र, मुंबईच्या (Vishwa Samvad Kendra Mumbai) वतीने देण्यात येणारे 22 वे ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ (Devarshi Narad Awards) राज्यपाल बैस यांच्या हस्ते बुधवारी (दि. 3) राजभवन (Raj Bhavan Mumbai) येथे समारंभपूर्वक देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांच्या हस्ते यावेळी मुद्रित (Print), इलेक्ट्रॉनिक (Electronic), डिजिटल (Digital Media) व समाजमाध्यम क्षेत्रातील (Social Media) 10 पत्रकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. (Devarshi Narad Patrakarita Puraskars)

आपण 1978 मध्ये नगरसेवक झालो. तिथपासून आजपर्यंतच्या काळात माध्यम क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. पूर्वी चहासोबत वृत्तपत्र वाचल्याशिवाय लोकांची दिवसाची सुरुवात होत नसे. आज माध्यम बाहुल्याच्या युगात देखील मुद्रित माध्यमांचे स्वतःचे असे वेगळे महत्त्व आहे, त्यामुळे मुद्रित माध्यमे संपणार नाहीत, असे सांगताना वृत्तपत्रे समकालीन घटनांचे अभिलेख असतात व पुढे त्याचेच रूपांतर इतिहासात होते, असे राज्यपालांनी सांगितले.

ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर (OTT Platform) वापरल्या जाणाऱ्या अयोग्य भाषेबद्दल चिंता व्यक्त करून विद्यार्थी व युवकांच्या हाती योग्य व सुरक्षित मजकूर पडले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. ‘सत्य एक असते व सुजाण लोक ते वेगवेगळ्या दृष्ट‍िने पाहतात’ या वचनाचा संदर्भ देताना आजकाल बातम्यांना अनेक रंगांची आवरणे असतात, त्यामुळे सत्य शोधणे कठीण जाते, अशी टिप्पणी राज्यपालांनी केली.

रत्नागिरी येथील ज्येष्ठ पत्रकार बालकृष्ण ऊर्फ प्रमोद कोनकर
(Senior Journalist Balkrishna alias Pramod Konkar), दैनिक सकाळचे राजकीय प्रहसन लेखक प्रवीण टोकेकर
(Journalist Pravin Tokekar), दीपक पळसुले (Journalist Deepak Palsule),
टाइम्स ऑफ इंडियाचे वैभव पुरंदरे (Journalist Vaibhav Purandare), नीलेश खरे (Journalist Nilesh Khare),
जयंती वागधरे (Journalist Jayanti Wagdhare), यू ट्यूबर अनय जोगळेकर (Journalist Anay Joglekar),
लेखक अंशुल पांडे (Journalist Anshul Pandey) व समाज माध्यम क्षेत्रातील निनाद पाटील
( Journalist Ninad Patil) व हृषिकेश मगर (Journalist Hrishikesh Magar) यांना पुरस्कार देण्यात आले.

विश्व संवाद केंद्राने २५ व्या वर्षात पदार्पण केले असून आजवर ७४ पत्रकारांना सन्मानित केले असल्याचे
अध्यक्ष सुधीर जोगळेकर (Sudhir Joglekar) यांनी सांगितले. विश्वस्त निशिथ भांडारकर (Nishith Bhandarkar)
यांनी प्रास्ताविक केले. अनय जोगळेकर व प्रवीण टोकेकर यांनी पुरस्कार विजेत्यांच्या वतीने सत्काराला उत्तर दिले.
कार्यक्रमाला इस्रायलचे मुंबईतील वाणिज्य दूत कोब्बी शोशानी ( Kobbi Shoshani) तसेच माध्यम क्षेत्रातील
निमंत्रित उपस्थित होते.

Web Title :-  Devarshi Narad Awards | Governor presents Devarshi Narad Awards to 10 journalists

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा 

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : राज्य उत्पादन शुल्कचा अधिकारी 15 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांनी पुन्हा एकदा रोखला बालविवाह ! 8 मार्चपासून आजपर्यंत जिल्ह्यातील 602 ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह विरोधी ठराव, एसपी पी.आर. पाटील यांचा पुढाकार