Devdatta Nage | पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी अभिनेता देवदत्त नागे सज्ज; छोट्या पडद्यावरील ‘या’ मालिकेत घेणार एंट्री

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Devdatta Nage | जय मल्हार मालिका म्हटलं की, प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो अभिनेता देवदत्त नागे. देवदत्तने जय मल्हार मालिकेतील खंडोबा दैवताची भूमिका इतकी सुरेख साकारली की, जी आजही प्रेक्षकांना चांगलीच लक्षात आहे. देवदत्तला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले होते. देवदत्त मध्यंतरी खूपच चर्चेत होता, याचे कारणही तेवढेच मोठे होते. नुकत्याच चर्चेत असलेल्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटात देवदत्त हनुमानाची भूमिका साकारणार आहे. त्याचा पहिल्या लुक शेअर करत त्याने चाहत्यांना याची माहिती दिली होती, तर त्याच्या चाहत्यांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे. लवकरच देवदत्त छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकेत एंट्री घेणार आहे. (Devdatta Nage)

https://www.instagram.com/accounts/login/?next=%2Fp%2FClISqhHKstU%2F&source=omni_redirect

कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेत देवदत्त एंट्री करणार आहे. सध्या ही मालिका एका रोमांचक मोडवर येऊन थांबली आहे. या मालिकेने प्रेक्षकांना आतापर्यंत धरून ठेवले आहे. या मालिकेत देवदत्त तुषार देसाई हे महत्त्वपूर्ण पात्र साकारणार आहे. मात्र, अद्याप तरी हे पात्र निगेटिव्ह असेल की पॉझिटिव्ह असेल हे समोर आलेले नाही. सध्या या मालिकेत मल्हार आणि अंतरा अनेक समस्यांना सामोरे जात आहेत. अशातच देवदत्तच्या एंट्रीने प्रेक्षकांना या मालिकेची जास्त गोडी लागणार आहे. (Devdatta Nage)

त्याच्या भूमिकेबद्दल बोलताना देवदत्त म्हणाला, “मला ही मालिका खूपच आवडायची. माझा या मालिकेवर जीव गुंतला होता. जेव्हा या मालिकेतील या पात्रासाठी मला विचारण्यात आले तेव्हा मी कोणताच विचार न करता होकार दिला. ज्या मालिकेचा 500 भागांचा टप्पा लवकरच पार पडणार आहे, अशा मालिकेचा भाग होणे हे खूपच भाग्याचे काम आहे. मला या नव्या कॅरेक्टरमध्ये लोकं अॅक्सेप्ट करतील अशी अपेक्षा आहे. त्यांना माझा हा लुकदेखील आवडेल हीच इच्छा व्यक्त करतो. मी कितीही हिंदी, मराठी चित्रपट केले तरी पुन्हा मी टेलिव्हिजनवर येणारच होतो. कारण याच टेलिव्हिजनमधून मला प्रसिद्धी मिळाली आणि त्याला मी कधीच सोडणार नाही”. आता आदिपुरुष चित्रपटामध्ये देवदत्त हनुमानाच्या भूमिकेत झळकणार आहे. पण त्याआधी त्याला छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते मात्र उत्सुक झाले आहेत.

 

Web Title :- Devdatta Nage | jai malhar fame devdatta nage will enter in colors marathi serial jeev maza guntala soon

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Thane Measles Update | मुंबईपाठोपाठ ठाणेसुद्धा ‘गोवर’च्या विळखेत; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू

Pravin Darekar | 123 कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबै बँकेचे अध्यक्ष भाजप आमदार प्रवीण दरेकरांना आरोपपत्रातून वगळले

Sanjay Raut | ‘शिवसेना सोडली आणि हेमंत गोडसे यांची कारकीर्द संपली, त्यांनी स्वत:च स्वत:ची कबर खोदली’ – संजय राऊत