‘महाशिव’ नव्हे तर ‘महाविकास’ आघाडीचा ‘फॉर्म्युला’ ठरला ! काँग्रेस आता ‘समसमान’साठी ‘आग्रही’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तास्थापनेच्या दिशेने कूच करत आहे, आता चर्चा सुरु झाली आहे की सत्तावाटपाची. माहिती मिळत आहे की महाविकासआघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार शिवसेना, राष्ट्रवादीला 15 – 15 मंत्रिपद तर काँग्रेसला 12 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

चार आमदारांमागे एक मंत्रिपद असा हा महाविकासआघाडीचा फॉर्म्युला आहे. त्यानुसार मंत्रिपदांचे वाटप करण्यात येईल. या फॉर्म्युल्या नुसार मिळालेल्या जागांच्या बरोबरीने 4 आमदारांमागे एक मंत्रिपद मिळणार आहे. म्हणजेच मंत्रिमंडळात या फॉर्म्युलानुसार 42 मंत्रिपदे असण्याची शक्यता आहे.

44 आकडा असला तरी सत्तास्थापनेसाठी महत्वाचा, त्यामुळे समसमान वाटपावर आग्रही राहण्याची भूमिका काँग्रेस घेऊ शकते असे कळते आहे. सकाळच्या काँग्रेस नेत्यांची बैठकीत यावर चर्चा झाली. काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीत बैठक पार पडली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पक्ष नेत्यांची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत आघाडीचे नेते यापुढील चर्चा करतील. ही बैठक शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी होईल. आघाडीचे नेते आता तेथे जमायला सुरुवात झाली आहे.

राज्यात या नव्या फॉर्म्युला नुसार सरकार स्थापन होणार का याची चर्चा सुरु झाली आहे. कमी जागा असल्यातरी काँग्रेस सत्ता वाटपात मागे सरकताना दिसत नाही. त्यामुळे फॉर्म्युला हाच राहणार की यात आणखी काही बदल होणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Visit : Policenama.com