Development of Jejuri Temple Fort | पुरातत्वीय जाण असलेल्या संस्थेकडून जेजुरी गडाचा कायापालट; 110 कोटींचा निधी मंजूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Development of Jejuri Temple Fort | महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या खंडोबा देवाच्या श्री क्षेत्र जेजुरी गडाचा (Development of Jejuri Temple Fort) कायापालट होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत जेजुरी गडाच्या विकासासाठी 109.57 कोटींच्या पहिल्या कामास मान्यता देण्यात आली आहे. गडावर असलेल्या ऐतिहासिक वास्तूंची मूळ शैली जपणे आवश्यक असल्याने ज्या संस्थेला पुरातत्वीय जाण आहे अशा संस्थेकडून कामे करून घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी केल्या.

बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule), आमदार संजय जगताप (MLA Sanjay Jagtap) यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जेजुरी गडावरील मंदिराचे संवर्धन करताना परिसरात असणाऱ्या इतर मंदिरेही पुरातत्व विभागाने (Department of Archeology) संरक्षित करावीत असेही ठाकरे यांनी सांगितले. (Development of Jejuri Temple Fort)

विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात मंदिर आणि गड संवर्धनाबरोबर जल व्यवस्थापनाचे काम हाती घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये शास्त्रीय पद्धतीने दगडांची स्वच्छता, हानिकारक जोडण्या काढणे, खराब झालेल्या चुन्याच्या गिलाव्याची डागडुजी, पाणी गळती थांबविण्यासाठी डागडुजी, वीज आणि पाणी पुरवठा, निचरा व्यवस्था, मल:निसारण आणि त्या पाण्याचा पुर्नवापर, योग्य वायुविजन प्रणाली, मंदिर परिसरातील धूळ गोळा करण्यासाठी यंत्र, घनकचरा व्यवस्थापन, भक्तांसाठी सोयीसुविधा, गर्दीचे व्यवस्थापन, आपत्कालीन व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक योजना आदी कामे करण्यात येणार आहेत.

तज्ज्ञांमार्फतच कामाची सूचना –

अजित पवार म्हणाले, ”ऐतिहासिक वास्तूंवर झाडे उगवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाय योजना करावी याशिवाय दगडांवर रंगरंगोटी न करता ते मुळ स्वरूपात ठेवावे. ही कामे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यात यावीत.” तर अशोक चव्हाण यांनी ‘पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीतील कामे या क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फतच करावीत,’ अशी सूचना केली

Web Title : Development of Jejuri Temple Fort | 110 crore fund for jejuri temple fort
approval for first phase work maharashtra state government

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त